मुंबई पुण्यातील 'कोरोना' दिल्लीच्या कोरोनाच्या तुलनेत अधिक शक्तिशाली ? ICMR चे शास्त्रज्ञ म्हणतायत...

मुंबई पुण्यातील 'कोरोना' दिल्लीच्या कोरोनाच्या तुलनेत अधिक शक्तिशाली ? ICMR चे शास्त्रज्ञ म्हणतायत...

मुंबई - सध्या जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनामुळे संपूर्ण जग त्रस्त आहे. जगभरात कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या कोविड १९ या आजाराची लागण होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतेय. अशात भारतात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार होऊ शकतो ही भीती लक्षात घेऊन अनेक खबरदारीचे उपाय राबवले गेलेत. सर्वात आधी २१ दिवस आणि त्यानंतर ३ मे पर्यंत भारतातील लॉक डाऊन वाढवण्यात आलाय. तरीही भारतातील कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढताना पाहायला मिळतेय.

मुंबईत सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. भारत चीनशी जोडला गेलाय. अशातही भारतात कोरोनाचे रुग्ण जगाच्या इतर देशांच्या तुलनेत कमी आहेत. म्हणूनच चारचा रंगत होती ती भारतात आढळणाऱ्या आणि परदेशात आढळणाऱ्या कोरोना व्हायरसमध्ये काही काही फरक तर नाही ना याची.

कोरोना व्हायरस हा SARS CoV-2 या प्रकारातला हा व्हायरस आहे. याला जगभरात ऍडव्हान्स म्हणजेच नॉवेल कोरोना भयर्स म्हणून संबोधलं जातं. चीनमधील काही संशोधकांच्यामते हा व्हायरस पसरत असताना या व्हायरसमध्ये काही बदल झालेले पाहायला मिळालेत. या व्हायरसने स्वतःच स्वतःमध्ये हे बदल घडवून आणलेत. म्हणूनच वेगवेगळ्या देशांमध्ये या व्हायरसमुळे होणारी लागण कमी जास्त प्रमाणात पाहायला मिळालीये.

चीनच्या या संशोधकांच्या मते एकट्या चायनामध्ये SARS CoV-2 या प्रकारातील व्हायरसमध्ये तीस वेगवेगळे प्रकार पाहायला मिळालेत. या व्हायरसचा रप्रसार होत असताना जे बदल यामध्ये होतायत त्यामुळे हा व्हायरस अधिक शक्तिशाली किंवा कमी शक्तिशाली होतो असं आभ्यासकांचं म्हणणं आहे. म्हणूनही जगभरातील संशोधकांना यावर औषध किंवा लस शोधण्यास वेळ लागत असल्याचं म्हणणं आहे.

मुंबई पुण्यातील कोरोना भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत वेगळा ? 

भारतात ICMR मार्फत कोरोनावर विविध प्रकारचं संशोधन सुरु आहे. ICMR जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO च्या संशोधनांवर देखील नजर ठेऊन आहे. अशात ICMR ने भारतातील कोरोना व्हायरसच्या टाईप बद्दल भाष्य केलंय. भारतातील कोरोना व्हायरसमध्ये भारतातील विविध भागांच्या किंवा प्रसाराच्या प्रक्रियेत कोणतेही बदल झालेले आढळले नाहीत. भारतातील कोरोना व्हायरस एकाच टाईपचा असल्याचं मत ICMRच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केलं आहे.

there are different types in novel corona virus corona in mumbai stronger than corona in delhi

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com