Raj Thackeray to launch MNS membership drive from Raigad
esakal
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उद्या वर्धापन दिन आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्यापासून मनसेच्या सदस्य नोंदणीला सुरुवात होणार आहे. राज ठाकरे यांनी स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. तसेच ते उद्या रायगड येथे जाऊन शिवरायांचा आशिर्वाद घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे यंदा फक्त कार्यकर्त्यांचीच नाही, तर महाराष्ट्रासाठी आणि मराठी भाषेसाठी करणाऱ्या प्रत्येकासाठी ही सदस्य नोंदणी असणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.