राज ठाकरेंचा 'फर्स्ट क्लास' प्रवास! लोकलमध्ये गर्दीच्या वेळेतही मिळाली विंडो सीट, मनसेच्या ७ जणांना बसायलाही जागा

Raj Thackeray in Local Train: मविआकडून निवडणूक आयोगाविरोधात सत्याचा मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दादर स्थानक ते चर्चगेट असा लोकल प्रवास केला. यावेळी त्यांनी काही प्रवाशांना ऑटोग्राफही दिले.
Raj Thackeray Travels by Mumbai Local Gets Window Seat During Rush Hour Fans Click Selfies

Raj Thackeray Travels by Mumbai Local Gets Window Seat During Rush Hour Fans Click Selfies

Esakal

Updated on

मतचोरी, मतदार याद्यांमधला घोळ, निवडणुकीतील गैरव्यवहार याविरोधात मविआने आज मुंबईत सत्याचा मोर्चा काढला आहे. या मोर्चासाठी मनसेसह डाव्या पक्षांच्या नेत्यांचा सहभाग असणार आहे. मोर्चासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मनसे नेते आणि कार्यकर्त्यांसह लोकलने चर्चगेटच्या दिशेनं रवाना झाले आहेत. मुंबईच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक मनसैनिक मोठ्या संख्येने सीएसएमटी स्थानकाकडे येण्यासाठी निघाले आहेत. मुंबईच्या चारकोप विधानसभा क्षेत्रातील मनसैनिकांकडून देखील यासाठी तयारी करण्यात आली असून शेकडो मनसैनिक ढोल ताशा वाजवत आता रेल्वेने सीएसएमटीकडे निघाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com