

Raj Thackeray
ESakal
मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिकेत सुरू झालेल्या शह-काटशहाच्या राजकारणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) चक्क उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला पाठिंबा दिल्याने पक्ष प्रमुख राज ठाकरे हे व्यथित झाले आहेत. ही त्यांच्या पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधत राज यांनी राजकारणात लवचिक भूमिका घ्यावी लागते परंतु त्यामुळे मराठी माणसांवरील प्रेम कमी होत नाही, असे समाजमाध्यमांवर नोंदविलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.