

raj thackeray
esakal
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारयाद्यातील कथित घोळावरून विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांच्या बंगल्यावर १३० हून अधिक मतदारांची नोंदणी झाल्याचा गंभीर आरोप केला होता. याशिवाय एका मतदाराचा पत्ता "सुलभ शौचालय" असल्याचा दावा करीत त्यांनी निवडणूक आयोगावर टीकास्त्र सोडले.