नवा झेंडा नवा अजेंडा? आज मनसेचा पहिलावहिला महामेळावा..

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 January 2020

मुंबई - हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. याचंच अवचित्त साधत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या पहिल्यावहिल्या महामेळाव्याचं आयोजन केलंय. अशात पराभवाच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी राज ठाकरे आपल्या इंजिनाचे ट्रॅक्स बदलताना पाहायला मिळतायत. मुंबईत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पहिलावहिला महामेळावा  पार पडणार आहे. गोरेगावच्या नेस्को मैदानावर हा सोहळा पार पडणार आहे. मोठ्या संख्येने मनसैनिक गोरेगावात नेस्को मैदानात हजार आहेत. 

आज संध्याकाळी राज ठाकरे महामेळाव्यातून आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना पाहायला मिळतील. दरम्यान, आजच्या या महामेळाव्याच्या माध्यमातून राज ठाकरे हिंदुत्वाच्या विषयावर कसा स्टॅन्ड घेतायत हे पाहणं अत्यंत महत्वाचं राहणार आहे. 

मोठी बातमी - 'ते' आधी निर्जनस्थळी न्यायचे; मग करायचे...

झेंडा बदलणार - 

गेले काही दिवस चर्चा आहे ती मनसेच्या बदललेल्या झेंड्याची. या आधी मनसेच्या झेंड्यावर पाच रंग पाहायला मिळाले. मात्र आता राज ठाकरे  यांनी आपल्या पक्षाचा झेंडा बदलला आहे. माध्यमांसामोर आलेल्या माहितीनुसार मनसेच्या नव्या झेंड्यावर शिवमुद्रा पाहायला मिळणार आहे असं देसखील बोललं जातंय

अमित ठाकरे यांचं लॉन्चिंग - 

गेले अनेक दिवस चर्चा होती ती अमित ठाकरे यांच्या राजकीय लॉन्चिंगची. अशात आज महामेळाव्याच्या माध्यमांतून राज ठाकरे पुत्र अमित ठाकरे यांना राजकारणात सक्रिय करणार, राजकारणात उतरवणार हे देखील बोललं जातंय. दरम्यान मुंबईतील रस्त्यात लागलेल्या बॅनर्सवर अमित ठाकरे यांचे फोटो देखील झळकताना पाहायला मिळतंय.

आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोणत्या नेत्याला कोणती जबाबदारी दिली जाते. स्वतः अमित ठाकरे यांच्याकडे काय जबाबदारी दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे

raj thackerays maharashtra navanirman sena to change political ideology 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raj thackerays maharashtra navanirman sena to change political ideology