ठाण्यातून राज ठाकरेच्या प्रचाराची सांगता..

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 October 2019

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नवी मुंबईनंतर ठाण्यात जाहीर सभा पार पडली. ठाण्यातील मनसे उमेदवार अविनाश जाधव याच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांनी सभा घेतली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्यातील सभा विधानसभेसाठीची शेवटची सभा होती. या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी सत्ताधार्यासोबत मतदारांनाही फैलावत घेतलं. यावेळी, राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेचाचा मुद्दा अधोरेखित केला. मुंबईतील भूमिपुत्रांचं होणारं स्थलांतर, मुंबई ठाण्यात येणारे परप्रांतीयांचे लोंढे यावर राज यांनी सडकून टीका केलीये. या सगळ्यावर सरकार निर्णय घेत नसल्याचा आरोप राज ठाकरे यांनी लागावालाय. 

गेल्या पाच वर्षांपूर्वी सत्ताधाऱ्यांनी जाहीरनाम्यात गोष्टी दिल्या त्या त्यांना पूर्ण करता आलेल्या नाहीत. तरी सुद्धा हे लोक मोठ्या हिमंतीने मते मागण्यासाठी येतात, अशा लोकांना मते मागताना लाज कशी वाटत नाही अशा शब्दात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला. राज ठाकरे यांनी पंजाब-महाराष्ट्र बॅंकेवरील निर्बंधांवरून सरकारवर सडकून टीका केली. याचसोबत महाराष्ट्र पोलिसांना 48 तासांची सूट दिली तर क्राईम रेट शून्यावर येईल असंही राज ठाकरे म्हणालेत. 

राज ठाकरे यांच्या ठाण्यातील भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे : 

  • महाराष्ट्र म्हणजे थंड, लोण्याचा गोळा - राज ठाकरेंचा घणाघात 
  • महाराष्ट्र पोलिसांना 48 तासांची सूट दिली तर शहरांतील क्राईम रेट शून्यावर येईल 
  • भूमिपुत्र ठाणे मुंबईतून हद्दपार होतोय - राज ठाकरे 
  • मोबाईल कंपन्यांची दादागिरी बंद करणारा पहिला माणूस म्हणजे अविनाश जाधव - राज ठाकरे 
  • ठाणे हा देशातील सर्वाधिक स्थलांतर होणाऱ्या जिल्ह्यांपैकी एक जिल्हा 
  • नोटाबंदीवरून राज ठाकरे यांची सरकारवर टीका 
  • ''देशात खेळ सुरु आहे'', राज ठाकरे यांचं सरकारवर टीकास्त्र
  • मंदीमुळे देशातील 5 लाख उद्योगधंदे बंद झालेत - राज ठाकरे
  • तरुणांच्या नोकरीच्या प्रश्नावरून राज ठाकरे यांचा सरकारवर घणाघात 
  • ठाण्यातील जुन्या इमारतींचा प्रश्न गंभीर, यावर ठाणेकर कधी बोलणार ? - राज ठाकरे

आता निवडणुकीचा प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. अशातच राज ठाकरे यांनी मनसेला विरोधीबाकावर बसवण्याच्या मागणीकडे मतदार राजा कसा पाहतो आणि राज ठाकरे यांना मताचं दान देतो का हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.     

Webtitle : raj thackerays vidhan sabha political campaign wrap up speech details

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raj thackerays vidhan sabha political campaign wrap up speech details