मुंबई महापौर किशोरी पेडणेकरांच्या अडचणी वाढणार? पेडणेकरांविरोधात पोलिसात तक्रार

सुमित बागुल
Monday, 19 October 2020

"माझं मत अवैध ठरवलं आणि मतदारांनी मतपत्रिका दाखवण्याचा आग्रह करूनही मतपत्रिका दाखवण्यात आली नाही. तसेच माध्यमांना माझी सही अवैध ठरवण्यात आल्याची माहिती देण्यात आली" - केणी

मुंबई : मुंबई महानगर पालिकेतील विविध प्रभाग समित्यांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्यात. यामध्ये शिवसेनेने गेल्या वेळच्या तुलनेत चांगली कामगिरी बजावली आहे. यंदा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे. त्यामुळे यंदाच्या प्रभाग समित्यांच्या निवडणुकांमध्ये तसाच मुड पाहायला मिळाला. शिवसेनेने काँग्रेसला हाताशी धरत गेल्यावेळच्या तुलनेत यंदा अधिक चांगली कामगिरी बजावली आहे. यंदा शिवसेनेने तब्बल १२ प्रभाग समित्यांवर आपला झेंडा फडकावला आहे. गेल्या वेळी शिवसेनकडे ८ प्रभाग समित्या होत्या, मात्र यंदा शिवसेनेचा आकडा १२ वर गेलाय. 

दरम्यान, याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात मुंबईतील आझादनगर पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आलेली आहे. भाजपकडून किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे. पिठासीन अधिकारी म्हणून मुंबईच्या महापौर यांनी रजनी केणी यांचे मत अवैध ठरवलं होतं, म्हणून केणी यांनी थेट आझादनगर पोलिस ठाणे गाठले आहे. 

महत्त्वाची बातमी : राज ठाकरे पोहोचलेत लिलावातीमध्ये, ठाकरे कुटुंबियांसाठी भावुक क्षण

काय आहे रजनी केणी यांचं म्हणणं : 

"माझं मत अवैध ठरवलं आणि मतदारांनी मतपत्रिका दाखवण्याचा आग्रह करूनही मतपत्रिका दाखवण्यात आली नाही. तसेच माध्यमांना माझी सही अवैध ठरवण्यात आल्याची माहिती देण्यात आली", असं केणी यांचं म्हणणं आहे. 

महत्त्वाची बातमी : जलवाहिनी फुटून जमलेल्या पाण्यात लीक झाला होता करंट, झटक्याने दोन BMC कर्मचारी दगावलेत

या संपूर्ण प्रकाराबाबत रजनी केणी यांनी महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त आणि मुंबई महानगरपालिका आयुक्त यांनादेखील एक पत्र पाठवलंय. त्यामुळे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. 

rajani keni filed police complaint at azad nagar police station against mayor kishori pednekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rajani keni filed police complaint at azad nagar police station against mayor kishori pednekar