esakal | राजस्थानातील राजकीय भूकंपावर मुंबईतून रेस्क्यू ऑपरेशन, पायलटच्या घरवापसीचं मुंबई कनेक्शन
sakal

बोलून बातमी शोधा

राजस्थानातील राजकीय भूकंपावर मुंबईतून रेस्क्यू ऑपरेशन, पायलटच्या घरवापसीचं मुंबई कनेक्शन

सचिन पायलट यांच्या घरवापसीमागे मुंबईतील काँग्रेसचे नेते आहेत. सचिन पायलट यांनी स्वपक्षात परत यावं म्हणून मिलिंद देवरा, दीपेंद्र हुंडा, जितीन प्रसाद आणि भंवर जितेंद्र सिंह यांच्या मध्यस्तीला यश आलंय.

राजस्थानातील राजकीय भूकंपावर मुंबईतून रेस्क्यू ऑपरेशन, पायलटच्या घरवापसीचं मुंबई कनेक्शन

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये राजस्थानमध्ये जे मोठं राजकीय नाट्य घडलं ते आपण सर्वांनी पाहिलं. राजस्थानातील अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट यांच्यावर  भाजप सोबत हातमिळवणी करून सरकार पाडण्याचे आरोप लावले होते. यानंतर राजस्थानात मोठा राजकीय भूकंप देखील आला. काँग्रेसमधील अंतर्गत वादाने उग्र स्वरूप धारण केलं. राजस्थानातील सरकार कोसळतं की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. अशात सचिन पायलट यांना काँग्रेस प्रदेश अध्यक्षपद आणि राज्याचं उपमुख्यमंत्रीपद सोडावं लागलं. दरम्यान आता सचिन पायलट यांच्या राहुल गांधी भेटीनंतर आपली बंडखोरीची तलवार म्यान करत पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र सचिन पायलट आणि त्यांच्या काँग्रेसमधील घरवापसीमागे मुंबईतील नेत्यांची मध्यस्ती कामी आलीये. 

हेही वाचा : काय सांगता! तब्बल १४ वर्षांनी हरवलेलं पाकिट सापडलं, वाचा सविस्तर बातमी

सचिन पायलट यांच्या घरवापसीमागे मुंबईतील काँग्रेसचे नेते आहेत. सचिन पायलट यांनी स्वपक्षात परत यावं म्हणून मिलिंद देवरा, दीपेंद्र हुंडा, जितीन प्रसाद आणि भंवर जितेंद्र सिंह यांच्या मध्यस्तीला यश आलंय. पायलट समर्थकांनी आधी प्रियांका गांधी यांची भेट घेतली त्यानंतर स्वतः सचिन पायलट यांनी देखील राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर अखेर सचिन पायलट यांनी आपलं बंड शमवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान सचिन पायलट यांच्या घरवापसीसाठी काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांचा देखील होकार आलाय. 

हेही वाचा : मुंबई लोकलमधून प्रवास करताय, क्यु-आर कोड संदर्भातली मोठी अपडेट

राजस्थानातील राजकीय भूकंपावर मुंबईतून रेस्क्यू ऑपरेशन

मिलिंद देवरा, दीपेंद्र हुंडा, जितीन प्रसाद आणि भंवर जितेंद्र सिंह हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय. मिळालेल्या माहितीप्रमाणे राहुल गांधी यांची गुप्त टीम पायलट यांच्या संपर्कात होती असं समजतंय. दरम्यान सचिन पायलट यांच्याकडून पुन्हा काँग्रेसमध्ये येण्याची चिन्ह दिसल्यावर या युवा नेत्यांनी काँग्रेसमधील जेष्ठांशी बातचीत केली आणि या प्रकरणात मध्यस्ती केली. सचिन पायलट यांच्याकडून घरवापसीचे संकेत मिळत असताना दीपेंद्र हुडा यांनी राहुल गांधी यांच्याशी संपर्क साधला आणि राहुल गांधी यांच्या होकारार्थी प्रतिसादानंतर या नेत्यांनी सचिन पायलट यांच्याशी संवाद साधला. काँग्रेसमधील जेष्ठ नेते अहमद पटेल, वेणुगोपाल पी चिदंबरम यांनीदेखील पायलट यांच्या भूमिकेला सकारात्मक प्रतीसाद दिल्याने सचिन पायलट यांचा परतीचा मार्ग मोकळा झाला. 

rajasthan sachin pilot vs ashok gehlot political earthquake and mumbais rescue operation