esakal | "तुम्ही फक्त आदेश द्या मनसेचा झेंडा संपूर्ण राजस्थानमध्येही फडकावू"
sakal

बोलून बातमी शोधा

"तुम्ही फक्त आदेश द्या मनसेचा झेंडा संपूर्ण राजस्थानमध्येही फडकावू"

"तुम्ही फक्त आदेश द्या मनसेचा झेंडा संपूर्ण राजस्थानमध्येही फडकावू"

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपले ट्रॅक बदलत आता हिंदुत्वाची कास धरलीये. मनसेकडून २३ जानेवारीला पहिलावहिला महामेळावा पार पडला. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपला झेंडा आणि आपला अजेंडा बदलला. अशात आता मनसेला इतर राज्यांमधून देखील प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय. 

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एक उमेश शर्मा नामक तरुण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशाचं नेतृत्व करावं असं सांगताना पाहायला मिळतोय. हा तरुण राजस्थानचा असून त्याने राज ठाकरे यांनी देशाचं नेतृत्व करावं अशी मागणी देखील केलीये.  

मोठी बातमी - कमळ सोडून हर्षवर्धन पाटील बांधणार शिवबंधन ? हर्षवर्धन पाटील शिवसेनेच्या वाटेवर ?  

राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरलाय. अवैधरित्या भारतात राहणाऱ्या  बांगलादेशी आणि पाकिस्तान्यांविरोधात मनसे मोठी रॅली काढणार आहे. एकंदरच राज ठाकरे यांच्या विचारसरणीने प्रभावित होऊन उमेश शर्मा यांनी राज ठाकरे यांना देशाचं नेतृत्व करावं अशी मागणी केलीये.  “राज ठाकरे तुम्ही ज्या प्रकारे हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन पुढे चालला आहेत त्यासाठी आम्ही तुमच्या नेतृत्वात राजस्थानमध्ये काम करण्यास इच्छुक आहोत. तुम्ही फक्त आदेश द्या मनसेचा झेंडा संपूर्ण राजस्थानमध्येही फडकावू, हा तरुण सांगतोय. दरम्यान या तरुणाने ९ तारखेला मनसे घेणार असलेल्या रॅलीला देशील समर्थन दिलं आहे.   

मोठी बातमी - बांगलादेशातील उपासमारीला कंटाळून आलो; सात महिलांना अटक!

राज ठाकरे यांच्यात बाळासाहेब ठाकरे यांची छबी दिसते असं अनेकांनी अनेकदा  म्हटलंय. उमेश शर्मा यांचं देखील हेच म्हणणं आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार राज ठाकरे यांच्यात पाहायला मिळतात असं या तरुणाचं म्हणणं आहे.  

राज ठाकरे यांनी आपला झेंडा आणि अजेंडा बदलल्याने अनेक हिंदू गट राज ठाकरेंच्या या निर्णयाने प्रभावित झाल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. दरम्यान राजस्थानच्या या तरुणाने शेअर केलेला हा व्हिडीओ याचंच उत्तम उदाहरण ठरतोय. 

rajasthani man called umesh sharma wishes to join MNS and willing to worl for mns in rajasthan