Breaking : राज्यराणी एक्‍स्प्रेस आता नांदेडपर्यंत धावणार!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 जानेवारी 2020

मध्य रेल्वेची सीएसएमटी ते मनमाड राज्यराणी एक्‍स्प्रेस 11 जानेवारीपासून आता नांदेडपर्यंत धावणार आहे.

मुंबई : मध्य रेल्वेची सीएसएमटी ते मनमाड राज्यराणी एक्‍स्प्रेस 11 जानेवारीपासून आता नांदेडपर्यंत धावणार आहे. या एक्‍स्प्रेसचा क्रमांकही बदलण्यात आला असून सीएसएमटी ते मनमाडदरम्यान ती अतिजलद गाडी म्हणून धावेल, असे रेल्वे मंत्रालयाने कळवले आहे. या एक्‍स्प्रेसच्या तिकिटांचे 10 जानेवारीपासून आरक्षण करता येणार आहे. 

महत्वाचं - अभिनेता सुबोध भावेंची पु्न्हा नाराजी, म्हणतोय की...

ही एक्‍स्प्रेस दररोज सायंकाळी 6.45 वाजता सीएसएमटी येथून सुटणार असून नांदेडला ती दुसऱ्या दिवशी सकाळी 7.20 वाजता पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासासाठी ती दररोज रात्री 10 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 10.07 वाजता सीएसएमटीला पोहोचणार आहे. या एक्‍स्प्रेसला एसी टू-टायरचा एक, एसी थ्री-टायरचा एक, एसी चेअर कारचा एक, शयनयान श्रेणीचे तीन, द्वितीय श्रेणी चेअर कारचे नऊ आणि सर्वसाधारण श्रेणीचे दोन डबे असणार आहेत.

हेही वाचा - मराठी विकिपीडिया होणार आणखी संपन्न

यांपैकी एसी चेअर कारचा एक आणि द्वितीय श्रेणी चेअर कारचे आठ डबे मनमाडमध्ये खुले केले जाणार आहेत. त्यामुळे मनमाड ते सीएसएमटी प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. एक्‍स्प्रेसच्या थांब्यांमध्ये मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajdhani Express will now run upto Nanded