esakal | अभिनेता सुबोध भावेची पुन्हा नाराजी, म्हणतोय..
sakal

बोलून बातमी शोधा

अभिनेता सुबोध भावेची पुन्हा नाराजी, म्हणतोय..

चित्रपटगृहासाठी भीक मागावी लागते! निर्माता, अभिनेता सुबोध भावे याची खंत 

अभिनेता सुबोध भावेची पुन्हा नाराजी, म्हणतोय..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भारतीय चित्रपट सृष्टीची निर्मिती मराठी माणसाने केली; मात्र आज महाराष्ट्रात मराठी चित्रपटाला चित्रपटगृह मिळवण्यासाठी भीक मागावी लागते, अशी खंत अभिनेता, निर्माता सुबोध भावे याने व्यक्त केली. जागतिक मराठी चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजच्या रोप्यमहोत्सवी वर्षानिमित्त जागतिक मराठी चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजतर्फे उद्योग क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या उद्योगकांना उद्योगरत्न पुरस्कार देण्यात आला. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्यात अभिनेता सुबोध भावेलादेखील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी सोबोध बोलत होता.

धक्कादायक - ​पेट्रोल पंपावरच करायचे 'तसले' धंदे, CCTV मध्ये झालं रेकॉर्ड..

चित्रपटसृष्टीला उद्योग म्हणून मान्यता मिळावी 

इतर उद्योगांच्या तुलनेत नाट्य सृष्टीला कोणतेही फायदे, सोयीसुविधा मिळत नाही. उद्योक म्हणून मान्यता न मिळालेल्या घटकाचा सन्मान केल्याबद्दल अभिनेता सुबोध भावे याने आभार व्यक्त केले. तसेच चित्रपट जगताला उद्योग म्हणून मान्यता मिळावी, अशी मागणी केली. 

Inside Story - असा अडकला एजाज लकडावाला पोलिसांच्या जाळ्यात..

महाराष्ट्रात एकही मराठी निर्मात्यांचा स्वतःचा स्टुडिओ नाही. तेच दक्षिणेतील राज्यांमध्ये तेथील निर्मात्यांनी सर्व यंत्रणा उभारल्याचे पाहायला मिळते. एका स्टुडिओतून अनेक रोजगार संधी निर्माण होतात. उद्योग क्षेत्रात मान्यता नसलेल्या चित्रपटसृष्टीतील एका घटकाचा आज सन्मान करण्यात आला, त्यामुळे मी संपूर्ण चित्रपट सृष्टीच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारतो, अशा भावना सुबोध भावे याने व्यक्त केल्या.

मोठी बातमी - #मनसे-#भाजप युतीबद्दल देवेंद्र फडणवीसांनी सोडलं मौन, म्हणालेत..

सरकारने आवश्‍यक पावले उचलावीत

महाराष्ट्रात अनेक तरुणांना मुंबईत येऊन चित्रपटसृष्टीत काम करायची इच्छा आहे. त्यांच्यासाठी सरकारने आवश्‍यक पावले उचलावीत, अशी अपेक्षा निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते महेश कोठारे यांनी व्यक्त केली. तर, मराठी तरुणांनी नोकऱ्यांच्या मागे न लागता उद्योग क्षेत्रात यावे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी केले. यावेळी उद्योगरत्न पुरस्काराने बडवे ग्रुप ऑफ कंपनीजचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत बडवे, श्रीनिवास इंजि. ऑटो कॉम्पोनेटसचे जी. एस. काळे, अब्दुला अँड असोसिएट, दुबईचे संस्थापक आणि संचालक अशोक वर्तक तसेच, अनंत एन्टरप्रायझेसच्या शिला धारिया यांना सन्मानित करण्यात आले. 

मोठी बातमी - दहा मिनिटांचं मौन आंदोलन आणि दीपिकाचा मास्टरस्ट्रोक...

marathi actor subodh bhave is unhappy for not getting space in theaters for marathi cinema

loading image