Shiv Sena workers join BJP
ESakal
मुंबई
Thane News: युतीधर्माची आठवण अन्...; डोंबिवलीत फोडाफोडीचं राजकारण पुन्हा पेटलं, भाजप आणि शिंदेसेनेत तणाव उफाळला
Shiv Sena workers join BJP: डोंबिवलीत पुन्हा वाद शिगेला पोहोचला आहे. शिवसेनेने भाजपवर तीव्र टीका केली आहे. कल्याण-डोंबिवली निवडणूकजवळ येताच फोडाफोडीचा खेळ पुन्हा सुरू झाला आहे.
शर्मिला वाळुंज
डोंबिवली, ता. 3 - एकमेकांचे पदाधिकारी आपल्या पक्षामध्ये घेण्यावरून काही दिवसांपूर्वी राज्याच्या मुख्य राजकारणात झालेला वाद शांत झाल्याचे वाटत असतानाच डोंबिवलीमध्ये आज पुन्हा एकदा हा वाद उफाळून आला आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज भाजपमध्ये केलेल्या प्रवेशानंतर डोंबिवलीत शिवसेनेकडून पत्रकार परिषद घेऊन भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली.

