
डोंबिवली : कल्याण ग्रामीण बदलतंय...कोणामुळे असे म्हणत शिवसेना शिंदे गटाचे महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांनी मनसे व शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराचा दारुण पराभव केला आहे. पहिल्या फेरीपासूनच मोरे यांनी मतांची लिड घेत आपला 1 नंबर कायम ठेवला. राजेश मोरे या सामान्य कार्यकर्त्यांच्या विजयामुळे शिवसेना शिंदे गटाच्या आनंदाला पारावर उरलेला नाही.