
डोंबिवली : शिवसेना शिंदे गटाचे कल्याण ग्रामीणचे नवनिर्वाचित आमदार राजेश मोरे यांनी राजकारणातील आपले गुरू पुंडलिक म्हात्रे यांची भेट घेत आशिर्वाद घेतले आहेत. केडीएमसीची सूत्रे डोंबिवली पश्चिमेतून हलतात असे बोलले जाते. मोठागावं मधील केडीएमसीचे माजी महापौर पुंडलिक म्हात्रे हे येथील मोठे प्रस्थ आहे. राजकीय क्षेत्रात राजेश मोरे यांचे म्हात्रे हे गुरू राहीले आहेत. सामान्य कार्यकर्ता ते आमदार असा मोठा पल्ला मोरे यांनी पार केला आहे. विजय मिळताच त्यांनी राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून आपल्या गुरूंची भेट घेऊन आशिर्वाद घेतले आहेत. तर म्हात्रे कुटुंबाने देखील त्यांचा सन्मान केला.