
उल्हासनगर : अभ्यासू माजी नगरसेवक म्हणून ओळखले जाणारे राजेश वधारिया यांची महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाने उल्हासनगर जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती केली आहे.आज विविध जिल्ह्यातील 23 जिल्हाध्यक्ष यांच्या नावाची घोषणा पक्षाने केली असून त्यात उल्हासनगर करिता राजेश वधारिया यांच्या नावाचा समावेश आहे.