Raju Patil Mns: मनसे आमदार राजू पाटलांविरोधात शिंदे गट लागला कामाला, या ठिकाणच्या घेतल्या भेटीगाठी!

Shivsena Ekanth Shinde: शिवसेना, मनसे कल्याण ग्रामीण मध्ये आघाडीवर असून इतर पक्षांचे इच्छुक पिछाडीवर आहेत.
Raju Patil Mns: मनसे आमदार राजू पाटलांविरोधात शिंदे गट लागला कामाला, या ठिकाणच्या घेतल्या भेटीगाठी!
Updated on: 

Diva: कल्याण ग्रामीण मधील विधानसभेसाठी शिंदे गटाचे इच्छुक उमेदवार राजेश मोरे यांनी दिव्यातील विविध राजकीय नेत्यांच्या घरगुती गणपतींना भेटी देऊन पूजा अर्चना केली. या भेटींमधून ते जास्तीत जास्त जनसंपर्क वाढवत असल्याने शिवसेनेचे कार्यकर्तेही आनंदीत आहेत.

येणाऱ्या विधानसभा निवडणुकी अगोदरचा हा शेवटचा गणेशोत्सव असल्याने त्याचा या निवडणुकीत काही इच्छुक उमेदवार प्रभावीपणे वापर जनसंपर्कासाठी करून घेताना दिसत आहे. तर कल्याण ग्रामीण मधून शिंदे गटाकडून राजेश मोरे हे इच्छुक उमेदवार असल्यामुळे त्यांनी कल्याण ग्रामीण मधील महत्वाच्या राजकीय नेत्यांच्या घरगुती गणपतींना आज उपस्थिती दाखवली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com