Raju Patil : मनसेच्या एकमेव आमदाराचा लागला राष्ट्रवादीच्या बॅनरवर फोटो ; चर्चांना उधाण !

Raju Patil : सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मनसे आमदारांचा निधी
Raju Patil : मनसेच्या एकमेव आमदाराचा लागला राष्ट्रवादीच्या बॅनरवर फोटो ; चर्चांना उधाण !
Updated on

Raju Patil : कल्याण डोंबिवली मध्ये सध्या प्रशासकीय राजवट लागू असून माजी लोकप्रतिनिधी च्या प्रभागातील कामे ही निधी अभावी अडकून पडत आहेत. शहरात विकासकामांसाठी भरघोस निधी येत असला तरी ग्रामीण भागात मात्र वेगळे चित्र आहे.

सत्ताधारी पक्षातील पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी यांच्याकडे पक्षातील वरिष्ठ लक्ष देत नसल्याने अखेर मनसेचे आमदार राजू पाटील यांच्या कामी आले आहेत. मनसे आमदार निधी देत असल्याने भाजप, शिवसेनेने त्यांचे आभार यापूर्वी मानले असताना, आता राष्ट्रवादीच्या बॅनरवर आमदार पाटील झळकले आहेत. माजी लोकप्रतिनिधी कुणाल पाटील यांनी आडीवली ढोकळी गावात हा आभारचा बॅनर लावला असून याची जोरदार चर्चा होत आहे.

Raju Patil : मनसेच्या एकमेव आमदाराचा लागला राष्ट्रवादीच्या बॅनरवर फोटो ; चर्चांना उधाण !
Maharashtra News : अभियांत्रिकी, ‘एमबीए’ला सुगीचे दिवस; 80 टक्क्‍यांहून अधिक जागांवर प्रवेश

कल्याण ग्रामीण भागातील आडीवली ढोकळी गावातील रस्त्याच्या कामासाठी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी 1 कोटी 44 लाख रुपयांचा निधी दिला आहे. आडीवली ढोकळीतील या रस्त्याच्या कामाला निधी मिळावा यासाठी राष्ट्रवादीचे माजी लोकप्रतिनिधी कुणाल पाटील व शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी राहुल पाटील हे पाठपुरावा करीत होते. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे राहुल यांनी आमदार पाटील यांचा गावात सत्कार केला होता. त्यानंतर आता कुणाल यांनी आमदार पाटील यांच्या हस्ते या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन केले. तसेच त्यांचे आभार माणण्याकरीता कुणाल यांनी आपल्या बॅनरवर त्यांचा फोटो लावला आहे.

Raju Patil : मनसेच्या एकमेव आमदाराचा लागला राष्ट्रवादीच्या बॅनरवर फोटो ; चर्चांना उधाण !
Sanjay Raut: लाठीमार करण्यासाठी मंत्रालयातून आलेला तो अदृश्य फोन कोणाचा? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल

यापूर्वी आडीवली ढोकळी गावाजवळ असलेल्या पिसवली गावातील रस्त्याच्या कामासाठी आमदारांनी निधी दिला आहे. येथील भाजपचे माजी लोकप्रतिनिधी मोरेश्वर भोईर यांनी तर उघडपणे येथील खासदार लक्ष देत नाहीत असे म्हणत आमदार पाटील निधी देतात तर त्यांचे आम्ही आभार मानणार असे स्पष्ट सांगितले होते. भोपर गावातील भाजपचे संदीप माळी यांनी देखील गावातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मनसे आमदारांचे आभार मानलेले सर्वांनी पाहिले आहे.

राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर भाजप सोबत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची जवळीक वाढली होती. त्यामुळे महायुतीमध्ये मनसे सुद्धा सामील होईल अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र राष्ट्रवादीचे अजित पवार महायुतीत सामील झाल्याने राजकारण बदलले. एकीकडे महाविकास आघाडी तर, दुसरीकडे महायुती असे चित्र राज्यात आहे.

Raju Patil : मनसेच्या एकमेव आमदाराचा लागला राष्ट्रवादीच्या बॅनरवर फोटो ; चर्चांना उधाण !
Mumbai Ganeshotsav : मोठ्या मंगलमू्र्तींचे गणेशमंडपात आगमन

तर मनसेने एकला चलो रे ची भूमिका मांडली आहे.

दरम्यान कल्याण डोंबिवली मध्ये मात्र वेगळे चित्र दिसत आहे. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेचे पदाधिकारी मनसेचे आमदार पाटील यांना धरून आहेत. त्यांचे जाहीर आभार देखील मानले जात आहेत. आगामी काळात लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यामुळे एक वेगळीच चर्चा रंगली आहे.

दरम्यान याबाबत मनसे आमदार पाटील यांनी सांगितले की निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधी यांनी पक्ष न पाहता काम केले पाहिजे. शहराच्या विकास कामात राजकारण केले जाऊ नये. आम्ही ते कधीही केले नाही म्हणून कामांना निधी देतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com