
डोंबिवली : भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान मनसेचे नेते माजी खासदार राजू पाटील यांनी देखील खासदार दुबेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. काहीजण भुंकत असतात आम्ही त्याकडे लक्ष देत नाही. ते ज्या राज्याचे प्रतिनिधित्व करतात त्यापेक्षा जास्त दहा पट जीएसटी आपला एकटा महाराष्ट्र राज्य एका वर्षात देतो. त्यांना दहा वर्षात जमनार नाही तेवढं महाराष्ट्र एका वर्षात देत आणि हे आम्हाला शिकवणार ? असं पाटील यांनी म्हटलं आहे.