

KDMC Election candidates List
ESakal
डोंबिवली : कल्याण–डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे, ठाकरे गट आणि मित्रपक्षांमध्ये जागावाटपावर जवळपास अंतिम एकमत झाले असून, दोन दिवसांत उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. एकूण 122 जागांपैकी मनसे 50 ते 55 जागांवर निवडणूक लढवणार असून उर्वरित जागा ठाकरे गट व शिवसेना–मित्रपक्षांमध्ये अॅडजस्ट केल्या जाणार असल्याचे मनसे नेते राजू पाटील यांनी स्पष्ट केले.