
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली: कल्याण शीळफाटा रोडवर शनिवारी सकाळपासून मोठ्या प्रमाणात वाहनकोंडी झाली होती. रक्षाबंधन आणि सलग सुट्ट्या आल्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडले आहे. त्यामुळे कोंडीत अडकले आहेत. भावाकडे रक्षाबंधनसाठी निघालेल्या लाडक्या बहिणी देखील या कोंडीत अडकल्या. तीन ते चार तास वाहने कोंडीत अडकून पडली आहेत. सर्वसामान्य नागरिकांसोबतच रुग्णवाहिकांना देखील याचा फटका बसला. यावर मनसे नेते राजू पाटलांनी नाराजी व्यक्त केली आहे.