esakal | धनंजय मुंडेना कोणी पाठवली नशाबंदीची राखी? नक्की काय केलीये मागणी वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

धनंजय मुंडेना कोणी पाठवली नशाबंदीची राखी? नक्की काय केलीये मागणी वाचा

प्रभावी नशाबंदीसाठी धनंजय मुंडेना पाठवली राखी
नशाबंदी मंडळाचा अनोखा उपक्रम

धनंजय मुंडेना कोणी पाठवली नशाबंदीची राखी? नक्की काय केलीये मागणी वाचा

sakal_logo
By
प्रशांत कांबळेमुंबई : 'व्यसनमुक्तीशी बंधन आणि व्यसनापासून रक्षण' हा संदेश देण्यासाठी राज्यातील नशाबंदी मंडळाच्या महिलांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना अनोखी राखी पाठवली आहे. राज्यातील नशाबंदीची मोहिम अधिक प्रभावीपणे राबवावी, अशी मागणी यानिमित्ताने महिलांनी मुंडे यांच्याकडे केली आहे.  

राज्यात खासगी बसवाहतूक सुरु, मग एसटीची वाहतूक बंद का?

'व्यसनांना हवे लॉकडाऊनचे बंधन, तेव्हाच होईल महिलांचे रक्षण', असे विविध घोषवाक्यांनी हि राखी सजवलेली आहे. राज्य सरकारने नशाबंदीची मोहिम अधिक प्रभावी करावी. त्यामुळे नशेतून महिलांवर होणारा हिंसाचार टाळता येणार आहे, असे महिलांनी म्हटले आहे. महाराष्ट्र व्यसन मुक्त व्हावा यासाठी व्यसनमुक्त धोरण 2011 ची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी महिलांनी केली आहे. त्या उद्देशानेच सामाजिक न्यायमंत्री धनजंय मुंडे यांना राखी पाठवल्याचे महिलांनी सांगितले आहे.

त्यासोबतच मंडळाच्या जिल्हा संघटक व महिला कार्यकर्त्या रक्षाबंधननिमित्त व्यसनमुक्तीचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणात  करणार असल्याची माहिती मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास व सचिव अमोल मडामे यांनी दिली आहे.

लॉकडाऊनमध्येही 'शुभमंगल सावधान' जोरात; चार महिन्यांत 556 जोडपी विवाहबद्ध....

प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रम
कोव्हिड-19 च्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या नियमानूसार सोशल डिसस्टिंग पाळून नशाबंदी मंडळाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यातील खासदार, पालकमंत्री, आमदार,  नगरसेवक,  जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, समाजकल्याण अधिकारी यांच्यासह व्यसनमुक्तीसाठी कार्यरत व्यक्ती, संस्था यांना राखी बांधून व्यस्नमुक्तीचा प्रचार करण्यात येणार आहे.

---------------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे

loading image