राम मंदिर स्थानकाबाहेर युतीच्या सेतूला तडा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

शिवसेना-भाजपच्या जुगलबंदीला विहिंपची खंजिरी, रेल्वेमंत्र्यांनी दोन मिनिटांत भाषण आटोपले
मुंबई - अनेक समस्यांचे डबे जोडलेल्या राम मंदिर स्थानकाचे उद्‌घाटन अखेर गुरुवारी सायंकाळी लोकलच्या धडधडाटापेक्षा घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांच्या कल्लोळातच उरकले गेले. या स्थानकाचे श्रेय घेण्यासाठी भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांतील रस्सीखेच सुरू झाली. भाजपचा नेता बोलायला उभा राहिला, की शिवसैनिक तारस्वरात घोषणा देत होते.

शिवसेनेचा नेता भाषण करू लागला, की भाजप कार्यकर्त्यांच्या घोषणा टिपेला पोचत होत्या. दरम्यानच्या काळात विश्‍व हिंदू परिषदेचे नेते आपले निशाण उंचावत "जय श्रीराम' असे ओरडत होते.

शिवसेना व विश्‍व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना दोन मिनिटांत भाषण आटोपते घ्यावे लागले. आम्हीच वचनपूर्ती केली, असा दावा कार्यकर्ते करत असताना सर्वसामान्यांवर मात्र "हे राम' म्हणण्याची वेळ आली. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याच हस्ते उद्‌घाटन करण्याच्या अट्टहासामुळे या स्थानकाचे उद्‌घाटन दोन वेळा पुढे ढकलण्यात आले होते. आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजप व शिवसेनेमध्ये राम मंदिर स्थानकासमोर घोषणायुद्ध रंगले. दोन्ही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते हाती झेंडे घेऊन मोठ्या संख्येने आले होते. तिकीटघराजवळ छोटा मंच उभारण्यात आला होता; पण इथे आलेल्या प्रत्येकाच्या उरात आपल्याच इच्छापूर्तीचा गर्व मोठा होता. खासदार गजानन किर्तीकर, परिवहनमंत्री दिवाकर रावते, खासदार किरीट सोमय्या यांच्या मांडीला मांडी लावून मंचावर बसण्यासाठी मतदारसंघातील स्थानिक नेत्यांची चढाओढ दिसली. या सगळ्या भाऊगर्दीत काही वेळ रेल्वेमंत्री सुरेश प्रभूच दिसेनासे झाले.

पश्‍चिम रेल्वेच्या जनसंपर्क विभागाच्या ढिसाळ नियोजनाचा फटकाही या कार्यक्रमाला बसला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ram Setu crack house station alliance