
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्याय देण्याचे आश्वासन दिल्याने विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना पदमुक्त करण्यासंबंधी विरोधकांचा ठराव बुधवारी मागे घेण्यात आल्याचे सभापती कार्यालयाने कळविले. मात्र विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तसा विचार आहे पण सर्व सदस्यांच्या सह्या झालेल्या नाहीत असे स्पष्ट केले.