esakal | "प्रशांत किशोरांच्या लागू नका नादी अन्..."; रामदास आठवलेंची सूचक कविता
sakal

बोलून बातमी शोधा

"प्रशांत किशोरांच्या लागू नका नादी अन्..."; आठवलेंची नवी कविता

"प्रशांत किशोरांच्या लागू नका नादी अन्..."; आठवलेंची नवी कविता

sakal_logo
By
विराज भागवत

शरद पवार-प्रशांत किशोर भेटीवर आठवले यांचं विनोदी ढंगात कवितेतून भाष्य

मुंबई: निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी ११ जूनला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या दोघांमध्ये सुमारे तीन तास प्रदीर्घ चर्चा झाली. शरद पवारांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर सकाळी 11 वाजता ही भेट झाली आहे. ही भेट नक्की कोणत्या मुद्द्यावर झाली याबद्दल नक्की कळू शकलं नाही. पण देशाच्या राजकारणात भाजपविरोधी नेत्यांची मोट बांधण्याच्या मुद्यावर या भेटीत चर्चा झाल्याची चर्चा आहे. त्यांच्या या भेटीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आपल्या खास कविमनाच्या शैलीत मत व्यक्त केले. मुंबईत संविधान निवासस्थानी प्रसिद्धीमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. (Ramdas Athawale Comedy way Poetry on Sharad Pawar Prashant Kishor Meeting)

हेही वाचा: शिवसेनेचा मुख्यमंत्री अडीच वर्षांनी बदलणार? संजय राऊत म्हणतात...

"प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी;

2024 मध्ये प्रधानमंत्री बनणार आहेत नरेंद्र मोदी!

नरेंद्र मोदी आहेत आंबेडकरवादी;

मग का प्रधानमंत्री बनणार नाहीत नरेंद्र मोदी?",

अशाप्रकारे विनोदी ढंगात कविता करत त्यांनी या भेटीवर आपलं मत मांडले.

हेही वाचा: Video: बापरे! घाटकोपरमध्ये बघता बघता कार जमिनीने गिळली?

"प्रशांत किशोर हे 2014 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींसोबत होते. मात्र 2019 च्या निवडणुकीत प्रशांत किशोर मोदींसोबत नव्हते तरीही 2019 च्या निवडणुकीत 303 जागा मिळवीत मोठा विजय मोदींच्या नेतृत्वात भाजपला मिळाला. ज्या राज्यात प्रशांत किशोर यांनी प्रचार केला नाही, त्या राज्यांतही भाजपला विजय मिळाला आहे. त्यामुळे माझे म्हणणे आहे प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी कारण 2024 मध्ये नरेंद्र मोदीच प्रधानमंत्री बनणार आहेत", असे आठवले म्हणाले.

हेही वाचा: 'तेव्हापासून ज्वलंत हिंदुत्व खुंटीला टांगलंय'; शिवसेनेवर टीका

विरोधी पक्षांमध्ये एकजूट नाही. त्यांच्यात एकमत नाही. एनडीए सोबत नसणारे विरोधी पक्षातील अनेक पक्ष प्रधानमंत्री नरेंद्र मोदींसोबत आहेत. त्यामुळे कोणी कितीही प्रयत्न केला तरी येत्या 2024 च्या निवडणुकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप एनडीए प्रचंड बहुमत मिळवून विजयी होतील आणि पुन्हा नरेंद्र मोदी प्रधानमंत्री होतील असा विश्वास ना रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.

loading image
go to top