

Ramdas Kadam's fierce attack on Manoj Jarange over 500 crore allegations.
Sakal
राज्यात दसरा मेळाव्याच्या निमित्ताने नेत्यांमध्ये शाब्दिक फड रंगल्याचे पाहायला मिळाले. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ५०० कोटी रुपयांचा गंभीर आरोप केल्यानंतर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेत त्यांना थेट प्रत्युत्तर दिले आहे. मुंबईतील नेस्को मैदानावरील मेळाव्यात कदम यांनी जरांगे यांच्यावर कडाडून टीका केली.