

Mulund Metro accident update
ESakal
मुंबईतील मुलुंड परिसरात शनिवारी झालेल्या भीषण मेट्रो अपघातानंतर रविवारी तणाव आणखी वाढला. मेट्रो लाईन ४ वरून ढिगाऱ्याखाली कोसळून मृत्युमुखी पडलेल्या रामधनी यादव यांच्या कुटुंबाने त्यांचा मृतदेह स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला आहे. यादव समाजातील शेकडो सदस्यांसह कुटुंबाने अपघातस्थळी निदर्शने केली आणि सरकारला त्यांच्या मागण्या मांडल्या.