esakal | 'ग्लोबल टीचर' पुरस्कार मिळालेल्या डिसले गुरूजींचा मुख्यमंत्र्यांकडून सत्कार
sakal

बोलून बातमी शोधा

'ग्लोबल टीचर' पुरस्कार मिळालेल्या डिसले गुरूजींचा मुख्यमंत्र्यांकडून सत्कार

‘ग्लोबल टीचर’ पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा परिषद सोलापूरचे शिक्षक रणजितसिंह महादेव डिसले यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

'ग्लोबल टीचर' पुरस्कार मिळालेल्या डिसले गुरूजींचा मुख्यमंत्र्यांकडून सत्कार

sakal_logo
By
तेजस वाघमारे

मुंबई: युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशनचा ‘ग्लोबल टीचर’ पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा परिषद सोलापूरचे शिक्षक रणजितसिंह महादेव डिसले यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी सत्कार करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार  उपस्थित होते. यावेळी डिसले यांच्या आई पार्वती, वडील महादेव डिसले यांचाही सत्कार करण्यात आला.

यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, शालेय शिक्षण मंत्री अॅड.वर्षा गायकवाड, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे उपस्थित होते.

युनेस्को आणि वार्की फाऊंडेशनचा ग्लोबल टीचर पुरस्कार मिळविणारे सोलापूर येथील शिक्षक रणजितसिंग डिसले यांचा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डिसले सरांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्राचे नाव देशातच नव्हे तर साऱ्या जगाला उज्वल केले असून सरांच्या कार्याचा अभिमान असल्याचे गौरवोद्गार याप्रसंगी शिक्षणमंत्र्यांनी काढले.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

जिल्हा परिषदेच्या अनेक शााळांमधून जास्तीत जास्त तंत्रस्नेही आणि सृजनशील शिक्षक निर्माण करण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याची भावना ग्लोबल पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी सत्कार समारंभाला दरम्यान म्हटलं आहे.

महत्त्वाची बातमी-  मुंबई लोकलनं प्रवास करत रोहित पवारांनी जुन्या आठवणींना दिला उजाळा

-------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Ranjit Singh Mahadev Disley homage CM Uddhav Thackeray