रसायनीत नाल्यात हिरव्या रंगाचे पाणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 मार्च 2020

ओढे, नाले यामध्ये प्रदूषित सांडपाणी सोडण्याच्या प्रकाराबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ फारसे गंभीर नसल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. पाताळगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी अशा प्रकारांना आळा घातला पाहिजे, अशी मागणी नागरिकांनी केली

रसायनीः पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील मुख्य रस्त्याकडेच्या नाल्यातील पाणी शुक्रवारी (ता. 6) हिरव्या रंगाचे झाल्याने नागरिकांमध्ये खळबळ निर्माण झाली. नाल्याच्या बाजूच्या कंपनीतून प्रदूषित सांडपाणी सोडले असल्याने नाल्यातील पाणी हिरव्या रंगाचे झाल्याची शक्‍यता नागरिक व्यक्त करत आहेत. नाल्यात अधूनमधून चोरून प्रदूषित सांडपाणी सोडले जात असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.

गरिबांचा पुरळपोळीचा घास हिरावला
 
परिसरातील क्षेत्राबाहेरील कारखानदार प्रदूषित सांडपाण्यावर कारखान्यातच ईटीपीत प्रक्रिया करतात. पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील कारखानदार सांडपाण्यावर कारखान्यातच ईटीपीत आणि त्यानंतर सीईटीपी केंद्रात आधुनिक पद्धतीने चांगली प्रक्रिया केली जात असल्याने नदीच्या जलप्रदूषणाला आळा बसला आहे. प्रदूषणही आटोक्‍यात आहे. दरम्यान, रसायनी-पाताळगंगा परिसरातील ओढ्यात, नाल्यात अधूनमधून चोरून प्रदूषित सांडपाणी सोडले जात असल्याने ते सांडपाणी नदीला जाऊन मिळते आणि नदीत मिसळले जाते. असे प्रकार समोर येत आहेत, अशी नागरिकांची तक्रार आहे. परिणामी नदीतील जलचरांना धोका होऊ शकतो, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.

ओढे, नाले यामध्ये प्रदूषित सांडपाणी सोडण्याच्या प्रकाराबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ फारसे गंभीर नसल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. पाताळगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी अशा प्रकारांना आळा घातला पाहिजे, अशी मागणी नागरिकांनी केली. दरम्यान, याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क करूनही त्यांनी तो स्वीकारला नाही. त्यामुळे त्यांची बाजू समजू शकली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rasayni-river-green water-polution-problem

टॉपिकस