#HopeOfLife : तंबाखूमुळे होणाऱ्या कर्करोगाच्या प्रमाणात 65 टक्‍क्‍यांची वाढ 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 25 December 2019

महिलांमध्येही  कर्करोगाचे प्रमाण वाढलं 

मुंबई : तंबाखूच्या व्यसानांशी संबंधीत असलेल्या कर्करोगाचे प्रमाण पुरुषांमध्ये गेल्या दहा वर्षात 65 टक्‍क्‍यांनी वाढले आहे. तर, महिलांमध्येही तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणाऱ्या मौखिक, फूफ्फूसाचे प्रमाण वाढत आहेत.

तंबाखू जन्य पदार्थांमुळे प्रामुख्याने मौखिक, जिभ आणि फफ्फूचा कर्करोग होऊ शकतो. मौखिक आणि जिभेचा कर्करोग होण्याचे प्रमुख कारण हे तंबाखू, गुटखा मानले जाते. तर, फफ्फूसाचा कर्करोग होण्याच्या प्रमुख कारण हे धुंम्रपान मानले जाते.

हेही वाचा :  बाहुबलीमुळे महिला ‘या’ दागिन्यांच्या प्रेमात!

गुटखा, तंबाखू चगळणे त्याच बरोबर धुम्रपानाचेही प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या कर्करोगाचे प्रमाण वाढले असल्याचे तज्ञ मानतात. मुंबई कर्करोग रजिस्ट्रीच्या नोंदी नुसार 2005 मध्ये फूफ्फूस, मौखिक आणि जिभेच्या कर्करोगाच्या 1217 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. तर,2015 मध्ये 1559 नवे रुग्ण या तीन प्रकारच्या कर्करोगाचे नोंदविण्यात आले आहेत. तर,2014 मध्ये हे प्रमाण 1710 एवढे होते

महिलांमध्येही  कर्करोगाचे प्रमाण वाढलं 

महिलांमध्येही मैखिक आणि फफ्फूसाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. 2005 मध्ये मैखिक कर्करोगाच्या 155 महिला रुग्णांची नोंद झाली होती. तर,2015 मध्ये फफ्फूसाच्या कर्करोगाच्या 372 महिला रुग्णांची नोंद जाली होती. तर,मैखिक कर्करोगच्या 210 महिला रुग्णांची नोंद झाली होती. 

आणखी वाचा :  अमली पदार्थांची बॅटमधून तस्करी

मुंबईसह देशात कर्करोगच्या पहिल्या दहा कारणांमध्ये मैखिक आणि फफ्फूसाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे. देशात 2018 मध्ये मैखिक कर्करोगच्या 92 हजार 11 नव्या पुरुष रुग्णांची नोंद झाली तर 27 हजार 981 महिला रुग्णांची नोंद होती. तर, 48 हजार 698 पुरुष रुग्णांना फफ्फूसाचा कर्करोग झाला होता. तर, महिलांमध्ये हे प्रमाण 19 हजार 97 एवढे होते. 

25 टक्के कर्करोग 

मुंबईत 2015 मध्ये 6 हजार 358 पुरुष रुग्णांची नोंद झाली होती.त्यात,मैखिक कर्करोगाचे प्रमाण 10 टक्के,फफ्फूसाच्या कर्करोगाचे प्रमाण 9 टक्के आणि जिभेच्या कर्करोगाचे 5.5 टक्के प्रमाण आहे.हे अनुक्रमके मुंबईत पहिले,दुसरे आणि चौथे प्रमाण आहे. 

आणखी वाचा : नेरूळमध्ये चक्क रिक्षातच वृक्षलागवड! काही दिवसात लागली फळे...

फफ्फूस, मैखिक आणि जिभेच्या कर्करोगाचे पुरुषांमधील प्रामण 

वर्ष - नव्या रुग्णांची नोंद - 1 लाख लोकसंख्येमागील प्रमाण 

  • 2005    -1018  -  8 
  • 2010    -1217  -  9.78 
  • 2014    -1710  -  13.52 
  • 2015    -1559  -  12.33 

Webtitle : rate of tobacco cancer increases by 65 percent


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rate of tobacco cancer increases by 65 percent