esakal | काळा बाजार करत असताल तर सावधान...!
sakal

बोलून बातमी शोधा

रेशन दुकानदारांकडून फसवणूक

कोरोनाच्या संकटामध्ये कोणीही उपाशी राहणार नाही, यासाठी रेशन दुकानामार्फत तिन्ही कार्डधारकांना धान्य उपलब्ध करून दिले आहे. तसेच त्याचे दरही ठरवून दिले आहेत; मात्र अशा परिस्थितीतही काही रेशनिंग दुकानदार ग्राहकांची फसवणूक करत असल्यामुळे सरकारने हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे. 

काळा बाजार करत असताल तर सावधान...!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नेरूळ (बातमीदार) : कोरोनाच्या संकटामध्ये कोणीही उपाशी राहणार नाही, यासाठी रेशन दुकानामार्फत तिन्ही कार्डधारकांना धान्य उपलब्ध करून दिले आहे. तसेच त्याचे दरही ठरवून दिले आहेत; मात्र अशा परिस्थितीतही काही रेशनिंग दुकानदार ग्राहकांची फसवणूक करत असल्यामुळे सरकारने हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे. 

हेही वाचा.. कर्नाळा अभयारण्यात पुन्हा पशू - पक्ष्यांचे राज्य

देशात लॉकडाऊनमुळे नागरिकांवर उपासमारीची वेळ येऊ नये, याकरता रास्त दुकानात सरकारने तिन्ही कार्डधारकांना धान्य उपलब्ध केले आहे. सध्या सरकारी नियमाप्रमाणे प्रति माणसे देय असणारे धान्य न देणे आणि वाढीव दराने पैसे घेणे अशा प्रकारे रेशन दुकानदार नागरिकांची फसवणूक व अडवणूक करत आहेत. परिणामी, रेशन दुकानदार सरकारच्या मूळ हेतूलाच काळीमा फासू लागले. त्यामुळे सरकारवर नागरिकांचा रोष वाढू लागला. यामधून अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या सर्वावरील उपाय म्हणून लॉकडाऊन कालावधीत शिधावस्तू उपलब्धतेचे सनियंत्रण करताना रेशन हेल्पलाईन बाबतीत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज असल्याचे दिसून आले आहे. रेशन तक्रारीसाठी/ माहिती मिळवण्यासाठी हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करा किंवा ईमेल व ऑनलाईन तक्रार प्रणालीचा वापर करून तक्रार नोंदवा, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. 

ठसकेदार बातमी वाचा... लॉकडाऊनमुळे मिरचीला कोरोनाचा ठसका

याठिकाणी करा तक्रार 
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून राज्यस्तरीय हेल्पलाईन ही सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. त्याचा हेल्पलाईन क्रमांक : 1800 22 4950/ 1967 (नि:शुल्क) आहे. अन्य हेल्पलाईन क्रमांक : 022- 23720582 / 23722970 / 23722483, ई-मेल helpline.mhpds@gov.in, ऑनलाईन तक्रार नोंदवण्यासाठी mahafood.gov.in या संकेतस्थळाचा वापर करा. तसेच मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्र नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहे. हा कक्ष सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहील. त्याचा हेल्पलाईन क्रमांक- 022-22852814, ई-मेल dycor.ho.mum@gov.in असा आहे. 

loading image