
डोंबिवली : डोंबिवली विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा महायुतीचे भाजपाचे उमेदवार रविंद्र चव्हाण यांनी विजयाचा चौकार मारत कमळ फुलविले आहे. 76 हजाराच्या वर मतांचा लिड घेत शिवसेना ठाकरे गटाच्या दीपेश म्हात्रे यांच्या मशालीची आग चव्हाण यांनी विझवली आहे. तिसऱ्या चौथ्या फेरीतच येथील निकालाचे चित्र स्पष्ट झाले आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत, गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.