

Trees Felled for RBI Staff Quarters Project
Esakal
मुंबई : मुंबईतील सिमेंटच्या जंगलात आधीच मोकळ्या हवेसाठी संघर्ष सुरू असताना, चेंबूर येथील आरबीआय स्टाफ क्वार्टर्सच्या उभारणीसाठी २१० झाडांच्या कत्तल व पुनर्रोपणाचा मार्ग मोकळा झाला आहे. वृक्ष प्राधिकरणाने या प्रस्तावाला मंजुरी दिली असली, तरी पर्यावरणप्रेमींनी या निर्णयाला ‘पर्यावरणाशी खेळ’ असल्याचे संबोधत तीव्र विरोध दर्शविला आहे.