सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येवर दिलेल्या निकालानंतर आता देशभरातून प्रतिक्रिया यायला सुरवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत, असदुद्दिन ओवैसी, बाबा रामदेव याचसोबत अनेकांच्या प्रतिक्रिया आता समोर आल्यात. अशातच महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या अयोध्या निकालाबद्दल सुप्रीम कोर्टाचे आभार मानलेत.

आपली प्रतिक्रिया देताना, राम जन्मभूमी संदर्भातील सर्वोच्च मूल्यांना अधिक मजबूत करणारा असा हा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलाय असं फडणवीस म्हणालेत. यामध्ये कुणाचाही विजय किंवा पराजय नाही. भारतीय अस्त्मितेचं प्रतिक आणि आस्था मजबूत करणारा असा हा निर्णय असल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचं सर्वांनी स्वागत केलंय.
माझी विनंती आहे की, सर्व धर्म आणि समुदाय यांनी या निकालाचा सहजभावाने स्वीकार करावा आणि शांतता-सौहार्द राखण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे. राष्ट्रीय ऐक्य, देशाच्या अखंडशक्तीला भक्कम करण्याची ही वेळ आहे.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 9, 2019
देशातील जनभावनेचा आदर करणारा हा निर्णय आहे. अनेक दशके ही प्रक्रिया सुरू होती, सर्व घटकांचा विचार या निकालातून प्रतिबिंबीत होतो. सत्य आणि न्यायाच्या मंथनातून अखेर हा निकाल आला आहे.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 9, 2019
हा ऐतिहासिक निर्णय एकमताने येणे, याला अधिक महत्त्व आहे. हा निकाल आपल्या देशाच्या बहुभाषिय, बहुधार्मिक सौहार्दतेला बळकटी देणारा ठरेल, हा मला पूर्ण विश्वास आहे. मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी अपेक्षिलेला भारतभक्तीचा भाव अतिशय महत्वाचा आहे.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 9, 2019
प्रभूश्रीरामचंद्रांच्या आदर्शांचा स्वीकार करीत, हा निकालाचा सर्वांनी स्वीकार करावा. यातूनच ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’च्या दिशेने भक्कम वाटचाल होणार आहे. देशातील एक मोठा विवाद आता यामुळे संपला आहे.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 9, 2019
अतिशय चांगलं वातावरण मुंबई आणि महाराष्ट्रात असल्याचं देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. महाराष्ट्राने सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल स्वीकारला आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल स्वीकारल्याबद्दल मी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो. येत्या काळात इतर धार्मियांचे सण येतायत. अशात सर्वांनी शांतता राखत सर्वधर्मीय सण साजरे करावे असं आवाहन त्यांनी केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी भारत भक्तीची भावना व्यक्त केली, तोच भाव भारतात निर्माण झालाय असं मला वाटतंय. सबका साथ सबका विकास यासाठी एकत्रित येत याचा सर्वजण एकजुटीने याचा सन्मान करतील. या निर्णयाचं स्वागत करतो असं शेवटी फडणवीस म्हणालेत.
अयोध्येतील ऐतिहासिक रामजन्मभूमी- बाबरी मशीद जमीनसंदर्भात आज (शनिवार) सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला असून, याठिकाणची वादग्रस्त जमीन तीन पक्षकारांना समान हिश्श्यांमध्ये विभागून देण्याचा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करत या जागेचे त्रिभाजन करणे अयोग्य असल्याचे म्हटले आहे. येथील वादग्रस्त जमीन हिंदूंचीच असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. 1950 पासून न्यायालयात असलेल्या या प्रकरणाच्या निकालाबाबात देशभरात उत्सुकता आहे.
WebTitle : reaction of devendra fadanavis on ayodhya verdict