Sakal Impact : कोणाच्या आशीर्वादाने वाधवान कुटुंब महाबळेश्वरमध्ये? : फडणवीस

Sakal Impact : कोणाच्या आशीर्वादाने वाधवान कुटुंब महाबळेश्वरमध्ये? : फडणवीस

मुंबई - लॉकडाऊनमध्येही महाराष्ट्र राज्याचे विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता यांचं पत्र घेऊन वाधवान कुटुंबातील २३ जण मुंबईहून महाबळेश्वरमध्ये पोहोचल्यानंतर सरकारवर विशेषत: गृह मंत्रालयावर चहू बाजूनी टीका केली जातेय. सकाळने ही बातमी प्रकाशित केल्यावर आता यावर राजकीय प्रतिक्रिया येताना पाहायला मिळतायत. सकाळने बातमी प्रकाशित केल्यावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या संबंधात प्रतिक्रिया दिली आहे. 

काय म्हणालेत देवेंद्र फडणवीस ? 

देशात सगळीकडे लॉकडाऊन आहे. महाराष्ट्रातील जनता घरामध्येच आहे. जरी कुणाचा मृत्यू झाला तरीही त्यांना घराबाहेर पडता येत नाहीये. अशात आरोपी असलेले वाधवान राज्य सरकारच्या परवानगीने महाबळेश्वरला फिरायला जातात. वरिष्ठ अधिकारी एवढी मोठी चूक करणार नाही, कारण सर्व वरिष्ट अधिकाऱ्यांना आपण काय करतोय आणि त्याच्या परिणामांची कल्पना असते. त्यांना कुणाचे तरी तरी आदेश असल्याशिवाय ते ही गोष्ट करणार नाहीत, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई न होता महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी "कोणाच्या आशीर्वादाने वाधवान कुटुंब महाबळेश्वरमध्ये गेलेत" याचं सविस्तर स्पष्टीकरण दिले पाहिजे. केंद्र सरकारने घोषित केलेल्या आरोपीला महाराष्ट्र सरकार पळून जाण्यास मदत करते की काय असा प्रश्न देखील फडणवीसांनी उपस्थित केलाय. 

सकाळ वृत्तपत्रात बातमी छापून आल्यानंतर आता याप्रकरणी  राजकारण तापताना पाहायला मिळतंय. आता यावर सरकारकडून काय प्रतिक्रिया येतेय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.  

reaction of ex maharashtra cm devendra fadanavis on wadhwan case

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com