नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसमोर समस्यांचा डोंगर; आयुक्तांना दिले निवेदन

सुजित गायकवाड
Tuesday, 8 September 2020

नवी मुंबई महानगरपालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या तसेच ठोक मानधनावरील व कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित मागण्याच्या संदर्भात पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची ता 8  रोजी पालिका मुख्यालयातील आयुक्तांच्या दालनात नवी मुंबई इंटक चे अध्यक्ष रवींद्र सांवत यांनी समस्या मांडल्या.

वाशी - नवी मुंबई महानगरपालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या तसेच ठोक मानधनावरील व कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित मागण्याच्या संदर्भात पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची ता 8  रोजी पालिका मुख्यालयातील आयुक्तांच्या दालनात नवी मुंबई इंटक चे अध्यक्ष रवींद्र सांवत यांनी समस्या मांडल्या. तर पालिका आयुक्तांन लेखील निवेदन दिले. यावर पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी देखील कर्मचांऱ्यांच्या समस्या सोडवण्याचे आवश्वान दिले.

राज्यातील कोव्हिड सेंटर्स भ्रष्ट्राचाराचे कुरण; देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेत घणाघात

नवी मुंबई महापालिका प्रशासनाला केंद्र व राज्य सरकारच्या स्तरावर सातत्याने पुरस्कारांचा वर्षाव होत आहे.  ज्या कामगारांच्या परिश्रमामुळे महापालिका पुरस्कारास पात्र ठरते.  त्या कामगारांच्या व अधिकार्‍यांच्या समस्या सोडविण्यास तसेच त्यांना सुविधा देण्यास महापालिका प्रशासनाकडून वर्षानुवर्षे स्वारस्य दाखविले जात नसल्याचा आरोप नवी मुंबई इंटकचे रवींद्र सांवत यांनी केला. पालिकेने  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भरती काढली. त्यामधील नर्स, औषध विकेरे ता या पदास 35000 इतके मानधन दिलेले आहे.तरी गेली 10 ते 12 वर्ष महानगर पालिकेत आरोग्य सेवा देत असलेले कर्मचांऱयाचा देखील पगार वाढवून त्यांच्यावरील अन्याय दुर करावा.  

रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांची वारेमाप लूट; दरेकर यांचा सरकारवर हल्ला

करार पध्दतीवरील कनिष्ठ अभियंता यांना सद्या स्थितीत 40,000 हजार रुपये मानधन देण्यात येते तरी कनिष्ठ अभियंता यांना देण्यात येणार्‍या मासिक मानधनाइतके मानधन उद्याान सहाय्यक व विविध विभागातील इतर पदवीधर यांना देण्यात योव. परिवहन उपक्रमातील ठोक मानधनावरील कर्मचार्यांचे वेतन वाढविण्यात यावे. पीएफ, ग्रॅच्यईटी, वैद्यकीय भत्ता, पगारी रजा सह अन्य सुविधा या कामगारांना प्रशासनाने उपलब्ध करून द्याव्यात. पालिका प्रशासनात 24 वर्षे सेवा झालेले स्वच्छता निरीक्षक व 12 वर्षे सेवा झालेले उपस्वच्छता निरीक्षक यांना आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात यावी. तसेच उपस्वच्छता निरीक्षकांना स्वच्छता निरीक्षकांचे वेतन लागू करण्यात यावे आणि  स्वच्छता निरीक्षकांना वरची वेतनश्रेणी लागू करण्यात यावे. आदि मागण्यांचे निवेदन आयुक्त अभिजित बांगर यांना दिलेले आहे.

------------------------------------

(संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Read before Navi Mumbai Municipal Commissioner about the problem of employees