मुंबईतून IFSC केंद्र हलवण्यामागे काय आहे कारण? 'या' मोठ्या नेत्याने केला गौप्यस्फोट...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 May 2020

ऐन कोरोनाच्या काळात राज्याचं राजकारण सध्या २ गोष्टींमुळे तापलं आहे ते म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा विषय तर दुसरी गोष्ट म्हणजे केंद्र सरकारनं IFSC केंद्र मुंबईहुन गांधीनगरला हलवायचा घेतलेला निर्णय.

मुंबई : ऐन कोरोनाच्या काळात राज्याचं राजकारण सध्या २ गोष्टींमुळे तापलं आहे ते म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा विषय तर दुसरी गोष्ट म्हणजे केंद्र सरकारनं IFSC केंद्र मुंबईहुन गांधीनगरला हलवायचा घेतलेला निर्णय. या सरकारच्या निर्णयावरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर आणि मोदींवर चांगलीच टीका करत एक मोठा खुलासा केला आहे.

सरकारनं IFSC म्हणजेच आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गांधीनगरला हलवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे राज्यात महाविकास आघडीचे सर्व नेते चांगलेच संतापले आहेत. या निर्णयावर फेरविचार करण्याची विनंतीही काही नेत्यांनी केली आहे. मात्र सरकारच्या या निर्णयावरून माज़ी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. IFSC केंद्र गांधीनगर गुजरातला हलवण्यामागे  बुलेट ट्रेन हे मुख्य कारण आहे असा खुलासा त्यांनी केला आहे.  

Bois Locker Room! विशीतील मुलांच्या गृपमध्ये सुरू होती 'ही' चर्चा... वर्गातील मैत्रिणीने ट्वीटरवर लीक केले चॅट

पृथ्वीराज चव्हाणांची मोदींवर टीका:

"हा निर्णय काही गेल्या महिन्यात झालेला नाही. IFSC केंद्र गांधीनगर न्यायचं हे २०१४ च्या आधीपासूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यात होतं. त्यानंतर २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर मोदींनी IFSC केंद्राच्या संदर्भातले अहवाल आणि इतर कागदपत्रं बाजूला ठेवली. यात मुंबईमध्ये IFSC केंद्र करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. मात्र तो निर्णय मोदींनी कचऱ्याच्या पेटीत टाकला. त्यानंतर १ मार्च २०१५ला  मोदींनी आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र हे गांधीनगरला होणार असा अध्यादेश काढला. मोदींकडे बहुमत असल्यामुळे यात मुंबईचा दावा डावलून त्यांनी गांधीनगरला IFSC केंद्र करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी याला काँग्रेसनं विरोध केला होता. मात्र त्यावेळी राज्यात असलेले भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे लक्ष दिलं नाही" असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

राज्य ग्रीन झोनमध्ये आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला स्पष्ट निर्देश, म्हणालेत... 

अहमदाबादला जिवंत करण्याचा हेतू:

मुंबईचं आर्थिक महत्त्व कमी करणं आणि गांधीनगरला महत्त्व देणं हा मोदी सरकारचा मुख्य हेतू होता.  त्यामुळे हे केंद्र हलवण्याचा निर्णय २०१५ सालीच झाला होता मात्र हे आपल्या सर्वांच्या आज लक्षात येत आहे.  मात्र गांधीनगर ही योग्य जागा कधीच नसेल हे सरकारला माहिती होतं.  तिथल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोणी येत नाही मुंबईलाच सगळे आंतरराष्ट्रीय प्रवासी येतात. त्यामुळे बुलेट ट्रेन करण्याची कल्पना मांडण्यात आली. काहीही करून अहमदाबादला जिवंत करायचं हीच महत्वाकांक्षा मोदींची होती," असा खुलासा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

reason behind shifting IFSC center to ahemadabad is bullet train says prithviraj chavan


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: reason behind shifting IFSC center to ahemadabad is bullet train says prithviraj chavan