esakal | चर्चगेटस्थानकात साचलेल्या पाण्याला 'ड्रीम प्रोजेक्ट' जबाबदार? वाचा काय आहे नेमकी कारणे
sakal

बोलून बातमी शोधा

चर्चगेटस्थानकात साचलेल्या पाण्याला 'ड्रीम प्रोजेक्ट' जबाबदार? वाचा काय आहे नेमकी कारणे

मुंबई विकास समिती निमंत्रक नंदकुमार साळवी यांनी याबाबत तातडीने निष्कर्ष काढणे चूकीचे ठरेल असे सांगितले. मात्र याची नक्कीच कारणे तपासून बघायला हवीत. त्यावेळी पावसाचे प्रमाण, भरती तसेच अन्य गोष्टीही विचारात घेणे योग्य होईल, असे त्यांनी सांगितले. 

चर्चगेटस्थानकात साचलेल्या पाण्याला 'ड्रीम प्रोजेक्ट' जबाबदार? वाचा काय आहे नेमकी कारणे

sakal_logo
By
संजय घारपुरे

मुंबई : गेले दोन दिवस मुंबईत झालेला पाऊस हा गेल्या सत्तेचाळीस वर्षांनंतर आलेला सर्वाधिक पाऊस ठरला कधीही पाणी न साचणाऱ्या भागातही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने मुंबईकरांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. मंत्रालय, पोलिस मुख्यालय, बीएसई भागातही पावसामुळे मोठे नुससान झाले. एवढेच नव्हे तर चर्चगेट रेल्वे स्थानकात पाणी साचल्याचा विरळा प्रसंग मुंबईकरांनी अनुभवला. मात्र चर्चगेट परिसरात पावसाचे पाणी साचण्यासाठी कोस्टल रोडचे काम कारणीभूत असल्याची शंका व्यक्त केला जात आहे.  याबाबत एका इंग्रजी वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.

मुसळधार पावसाचा फटका 'कोविड केअर सेंटर'ला, रुग्णांचे प्रचंड हाल

चर्चगेट स्थानकात चौपाटी तसेच अन्य ठिकाणहून समुद्राचे पाणी आले. हे पहिल्यांदाच घडले. कोस्टल रोडसाठी सुरु असलेल्या कामामुळे हे घडले का याचा अभ्यास करण्याची गरज आहे. हे काम यंदाच सुरु झाले आहे, याकडे वाहतूक तज्ज्ञ अजित शेणॉय यांनी लक्ष वेधल्याचे वृत्त आहे. मुंबई विकास समिती निमंत्रक नंदकुमार साळवी यांनी याबाबत तातडीने निष्कर्ष काढणे चूकीचे ठरेल असे सांगितले. मात्र याची नक्कीच कारणे तपासून बघायला हवीत. त्यावेळी पावसाचे प्रमाण, भरती तसेच अन्य गोष्टीही विचारात घेणे योग्य होईल, असे त्यांनी सांगितले. 

एका अनोख्या गावाची कहाणी ! इथे मित्राला नावानी हाक मारली तर भरावा लागतो दंड

दक्षिण मुंबईत झालेल्या जोरदार पावसामुळे चर्चगेट स्थानकात गुरुवारी पूरसदृश स्थिती होती. त्यावेळी पाणी स्थानकातच नव्हे तर येथील ऐतिहासिक इमारतीतही शिरले होते. या परिसरातील मेट्रोचे काम काही महिन्यांपासून सुरु आहे. मात्र नुकत्याच सुरु झालेल्या कोस्टल रोडच्या कामामुळे ही पूरस्थिती निर्माण झाली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

मुंबईकरांना प्रत्येकी १० हजार रुपये द्या, वाचा कोणी केली 'ही' मागणी

किती जोरदार पाऊस झाला तरी बफर एंडपर्यंत यापूर्वी पाणी आले नव्हते. पाणी ओसरण्यासही अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्याची यंत्रणेत काही प्रश्न आले असावेत असे वाटते, असा अंदाज रेल्वे आधिकाऱ्यांनी व्यक्त केला. पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप आहेत, पण यावेळी पाणी खूप वेळ साचून राहिले होते. त्याचबरोबर दक्षिण मुंबईत प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी साचले याकडेही अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले आहे.
---
संपादन : ऋषिराज तायडे

loading image
go to top