Maharashtra Politics | बंडखोर पुन्हा 'मातोश्री'च्या संपर्कात, दुसऱ्या पक्षात जाण्यारून मतभेद कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde

बंडखोर पुन्हा 'मातोश्री'च्या संपर्कात, दुसऱ्या पक्षात जाण्यारून मतभेद कायम

एकनाथ शिंदेंचं बंड आणि त्या पार्श्वभूमीवर राज्यात सुरू असलेला गोंधळ या सगळ्याची चर्चा आता देशभरात होत आहे. शिवसेनेच्या इतिहासात सर्वात मोठा धक्का पक्षाला बसला आहे. यामुळे सेनेसोबतच पर्यायाने महाविकास आघाडी सरकार धोक्यात येण्याची शक्यता आहे. यानंतरच सध्या महाराष्ट्रातील राजकारणाच्या अनुषंगाने देशभरात बैठका सुरू आहेत. (Maharashtra Politics)

दरम्यान, भाजपनेही कंबर कसली आहे. मात्र, आता शिंदेंच्या गोटात मतभेद असल्याचं समोर येत आहे. (Eknath Shinde)

भाजपच्या गोटातही खलबतांना सुरुवात झाली. शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत खरी शिवसेना त्यांचीच असल्याचा दावा केला. यामुळे खरी शिवसेना कोणाची, हा पेच आता वाढला आहे. दोन्ही गटांनी कायदेशीर लढाईला सुरुवात केली आहे. यामुळे दोन्ही पक्षांनी कोर्टाचे दरवाजे ठोठावण्याची तयारी केली आहे. दरम्यान, भाजपच्या गोटातून अद्याप कोणताही अधिकृत प्रतिसाद येत नसल्याने शिंदे गटात चुळबूळ वाढली आहे. (Eknath Shinde Latest News)

या दरम्यान, बंडखोर आमदारांच्या पक्षप्रवेशावरून अद्याप वाद सुरू आहेत. भाजपच सरकार स्थापन व्हायचं असल्यास या आमदारांना पक्षप्रवेश अनिवार्य आहे. त्यांना अपक्ष राहून सत्तेत सामील होण्यावर कायदेशी पेच निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सध्या या आमदारांमध्ये धुसफूस सुरू आहे.

16 आमदार पुन्हा 'मातोश्री'च्या संपर्कात

बंडखोर आमदारांमध्ये मतभेद वाढले आहेत. सत्तास्थापनेसाठी बंडखोर आमदारांचा स्वतंत्र गट कायद्यात बसत नसल्याने आता नव्या मार्गाच्या शोधात हे आमदार आहेत. बंडखोर आमदारांना कुठल्यातरी पक्षात विलीन व्हावच लागेल, अशी परिस्थिती आहे. दुसऱ्या पक्षात जाण्यावरून 20 ते 25 बंडखोर आमदारांमध्ये मतभेद असल्याचं कळतंय.

त्यामुळे एकनाथ शिदेंच्या गटात मतभेद वाढल्याचं कळतंय. बंडखोर आमदार पुन्हा 'मातोश्री'च्या संपर्कात आले आहेत. उद्धव ठाकरेंशी मध्यस्थी करण्याबाबत अनेक बंडखोरांचे सेनेच्या बड्या नेत्यांना फोन आल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे. त्यातच आदित्य ठाकरेंनीही 16 आमदार संपर्कात असल्याचं स्पष्ट केलं आहे.

टॅग्स :Eknath Shinde