राज्यात नवीन महाविद्यालयांना मान्यता; पदवी अभ्यासक्रमाच्या जागा वाढणार

तेजस वाघमारे
Friday, 7 August 2020

उच्च व तंत्रशिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी राज्यातील अकृषी विद्यापीठातील 47 महाविद्यालयांना अंतिम मान्यता दिली आहे. यामुळे पदवी प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या जागा वाढणार असून  कला, वाणिज्य, विज्ञान शाखांच्या पारंपरिक अभ्यासक्रमासह काही व्यावसायिक शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थांना दिलासा मिळणार आहे.

मुंबई : उच्च व तंत्रशिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी राज्यातील अकृषी विद्यापीठातील 47 महाविद्यालयांना अंतिम मान्यता दिली आहे. यामुळे पदवी प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या जागा वाढणार असून  कला, वाणिज्य, विज्ञान शाखांच्या पारंपरिक अभ्यासक्रमासह काही व्यावसायिक शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थांना दिलासा मिळणार आहे.

खोपोलीच्या कोव्हिड सेंटरमध्ये डॉक्टरच बेपत्ता; पालकमंत्र्यांचे दुर्लक्ष; रुग्णांना होताहेत अतोनात हाल -

विद्यापीठ कायद्यानुसार नवीन महाविद्यालय सुरु करण्यासाठी विद्यापीठे संस्थांकडून प्रस्ताव मागवतात. या प्रस्तावांची छाननी झाल्यानंतर महाविद्यालये सुरु करण्यास सरकारकडून मान्यता देण्यात येते. त्यानुसार यंदा उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दोन टप्प्यांमध्ये नवीन 47 महाविद्यालयांना अंतिम मान्यता दिली असून याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. मान्यता देण्यात आलेल्या महाविद्यालयांमध्ये सर्वाधिक महाविद्यालये ही मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहेत. मुंबई विद्यापीठाशी संलग्न असणारी 13 महाविद्यालये असून त्याखालोखाल संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीशी संलग्न 9 महाविद्यालयांना मान्यता मिळाली आहे. यामध्ये एका महिला महाविद्यालयाचाही समावेश आहे.

रेल्वेमध्ये वकिलांना प्रवेश नाहीच! राज्य सरकारने मागणी फेटाळली

एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या तीन महाविद्यालयांना मान्यता मिळाली आहे. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरमध्ये 2, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथे 3, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड एक आणि गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील दोन महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली आहे. या महाविद्यालयांना कायम विनाअनुदानित तत्वावर मान्यता दिली आहे. महाविद्यालयांना भविष्यात कधीही अनुदान न मागण्याचे प्रतिज्ञापत्र दिल्यानंतर संलग्नता देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

विद्यापीठ महाविद्यालय संख्या
मुंबई विद्यापीठ : 13
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ : 9
संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ : 4
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ : 9
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर : 2
एसएनडीटी मुंबई : 3
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ : 1
सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे : 3
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली : 2
अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ : 1
एकूण महाविद्यालय : 47

-------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Recognition of new colleges in the state; Degree course space will increase