यंदाच्या विसर्जन सोहळ्यात सर्वात कमी आवाजाची नोंद; कोरोनामुळे विसर्जन ध्वनीप्रदुषणविरहित

भाग्यश्री भुवड
Thursday, 3 September 2020

मुंबईत गेल्या 5 वर्षांच्या तुलनेत यंदाचे गणेशमुर्ती विसर्जन शांततेत साजरे झाले. विसर्जनाला सर्वात कमी आवाजाची नोंद यावर्षी करण्यात आली, असा अहवाल फाऊंडेशनने दिला आहे. 

मुंबई  : मुंबईत गेल्या 5 वर्षांच्या तुलनेत यंदाचे गणेशमुर्ती विसर्जन शांततेत साजरे झाले. विसर्जनाला सर्वात कमी आवाजाची नोंद यावर्षी करण्यात आली, असा अहवाल फाऊंडेशनने दिला आहे. 

मेट्रो 3 च्या विधान भवन स्थानकाचे बांधकाम पूर्ण; 'कट आणि कव्हर' या आधुनिक पद्धतीचे बांधकाम

कोरोनामुळे यंदा सरकारने आखून दिलेल्या शिस्तबद्ध पद्धतीने गणेशमूर्ती विसर्जन सोहळा पार पडला. त्यामुळे गेल्या पाच वर्षांमधील सर्वात कमी ध्वनी प्रदुषण असलेला गणेशोत्सव, असा आदर्श यंदा मुंबईने निर्माण केला आहे. विसर्जन काळात 100 डेसिबलचा आकडाही यंदा मुंबईने गाठला नाही.  काही अपवाद वगळता मुंबईतील ध्वनी प्रदुषणाची पातळी 100 डेसिबलच्या वर गेली नाही. एखाद दुसऱ्या ठिकाणी फटाक्यांचा वापर आणि वाद्यांचा वापर झाला. मात्र बहुतांश मुंबईकरांनी पालिकेच्या आवाहनाला सहकार्य केले. या काळात सर्वाधिक आवाजाची नोंद वाद्यांचा वापर झाल्यावर एकेठिकाणी 100.7 डेसिबल झाली. तर, फटाके फोडल्याने 94.4 डेसिबल आवाजाची नोंद एका ठिकाणी झाली.

ड्रग्सशी संबंध आढळल्याने रिया चक्रवर्तीच्या भावाची उद्या चौकशी; सॅम्युअल मिरांडालाही नोटीस पाठवण्याची शक्यता

यापूर्वी सर्वाधिक आवाजाची नोंद 2015 साली 123.7 डेसिबल इतकी झाली. तर, 2019 साली 121.3 डेसिबल इतक्या ध्वनी प्रदुषणाची नोंद झाली होती. अनेक भागात राजकीय पक्षांमार्फत होणारी कार्यकर्त्यांची गर्दी तसेच लाऊडस्पीकर आणि विसर्जन मिरवणुकांमध्ये होणारा वाद्यांचा आवाज तसेच फटाक्यांमुळे वाढणारे ध्वनी प्रदुषण आदी गोष्टी यंदा टळल्या. त्यामुळे हे ध्वनीप्रदुषण कमी झाल्याचे आवाज फाउंडेशनच्या संस्थापक सुमेरा अब्दुल्लाली यांनी सांगितले.

मोठी बातमी! दहावी बारावी फेरपरीक्षा यंदा लांबणीवर; जाणून घ्या कोणत्या महिण्यात होणार परीक्षा

मुंबईतील ध्वनी प्रदुषण
 ठिकाण     ध्वनी प्रदुषण (डेसिबलमध्ये)
 खारदांडा            76.5
 खार(जिमखाना)     76.8
लिंकिंग रोड         65.5
एसएनडिटी कॉलेज  68.8
जुहु कोळीवाडा      65.3
जुहु बीच            74.5
एस व्ही रोड          76.1
शिवाजी पार्क        81.2
प्रभादेवी मार्ग        94.4
वरळी नाका        67.2 
गिरगाव चौपाटी     74.8
गिरगाव             75.4

-------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Record the lowest noise at this year’s immersion ceremony; Immersion noise-free due to corona