पश्चिम रेल्वे मार्गावर फुकट्यांकडून तब्बल एक कोटींची वसूली

प्रशांत कांबळे
Sunday, 29 November 2020

मुंबई पश्चिम रेल्वे मार्गावर विनातिकीट अनधिकृत प्रवास करणाऱ्यांवर तिकीट तपासणीकांनी कारवाई केली आहे. यामध्ये उपनगरीय आणि लांब पल्यांच्या मार्गावर मिळून 25 हजार 900 प्रकरण दाखल करून त्यातून तब्बल 19 हजार 172 प्रकरण लोकल उपनगरीय मार्गावर नोंदविण्यात आले आहे.

मुंबईः  मुंबई पश्चिम रेल्वे मार्गावर विनातिकीट अनधिकृत प्रवास करणाऱ्यांवर तिकीट तपासणीकांनी कारवाई केली आहे. यामध्ये उपनगरीय आणि लांब पल्यांच्या मार्गावर मिळून 25 हजार 900 प्रकरण दाखल करून त्यातून तब्बल 19 हजार 172 प्रकरण लोकल उपनगरीय मार्गावर नोंदविण्यात आले आहे. एकूण 1 कोटी 4 लाख रूपयांची दंड वसूली केली आहे. 

लोकल, रेल्वे गाड्यांमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर रोख लावण्यासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर विशेष तपासणी मोहिम हाती घेतली आहे. त्यासाठी मे महिना ते नोव्हेंबर या महिन्या दरम्यान हे तपासणी मोहिम चालवण्यात आले.  ज्यामध्ये 25 हजार 982 प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये 19 हजार 172 प्रकरण उपनगरीय लोकल रेल्वे मार्गावरील असून ज्यामधून 55 लाख रूपयांची दंड वसूली केली आहे. तर लांब पल्यावरील मार्गावर 6810 प्रकरणात 49 लाख रूपयांची दंड वसूली केली आहे.

अधिक वाचा-  सौर उर्जेवर वाहने चार्ज करण्याचा प्रयोग यशस्वी; इंडियन ऑईल कॉर्पोरेशन कंपनीची कामगिरी

कोरोना काळात राज्य सरकारने ठरवून दिलेल्याच प्रवाशांना सध्या लोकल मार्गावर प्रवास करण्यासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर 1201 विशेष उपनगरीय सेवा सुरू आहे. दरम्यान सरसकट महिलांना सुद्धा प्रवेशाची परवानगी राज्य सरकारने दिली होती. दरम्या लोकल मार्गावर बनावट ओळख पत्र दाखवून सुद्धा लोकल प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई केल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी सांगितले आहे. 

अधिक वाचा-  कोरोनासाठी 'ड्राय आरटीपीसीआर' चाचणी! कमी वेळेत अचूक निदान होणार

-----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Recovery Rs one crore from freebies western railway line Action most suburban local routes


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Recovery Rs one crore from freebies western railway line Action most suburban local routes