Mumbai News : अग्निशमन दलात ९१० जागांसाठी भरती आजपासून

भरतीसाठी पहिल्यांदाच वापरण्यात येणार सीसीटीव्ही
Recruitment for 910 posts in fire brigade from today CCTV will used for recruitment first time mumbai
Recruitment for 910 posts in fire brigade from today CCTV will used for recruitment first time mumbaisakal

मुंबई : गेली अनेक वर्षे रखडलेली मुंबई अग्निशमन दलातील भरती प्रक्रिया अखेर उद्या शुक्रवारी १३ जानेवारीपासून सुरू होणार आहे. अग्निशामक या पदाच्या तब्बल ९१० जागांसाठीची ही भरती होणार आहे.

सात वर्षानंतर ही भरती होणार असून शुक्रवारी सकाळी ६ वाजल्यापासून दहिसर येथील भावदेवी मैदानात सरळसेवेने (वॉक इन सिलेक्शन) पद्धतीने होणारी ही भरती ४ फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. महत्वाचे म्हणजे पहिल्यांदाच या भरती प्रक्रियेसाठी सीसीटीव्हीचा वापर प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी होणार आहे.

लेखी परीक्षा न होता वॉक इन सिलेक्शन पद्धतीने ही भरती होणार आहे. अग्निशमन जवानांच्या भरती प्रक्रियेला भावदेवी मैदानात भरती प्रक्रिया राबवण्यासाठी अग्निशमन दलातर्फे तयारी पूर्ण झाली आहे.

भरती प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी भावदेवी मैदानात जागोजागी एकूण १६५ सीसीटीव्ही बसविण्यात आलेले आहेत. भरती प्रक्रियेचे चित्रीकरण करण्याकरिता ९ कॅमेरे असणार आहेत. यासर्व चित्रकरणासाठी एक नियंत्रण कक्षही तयार करण्यात आला आहे.

या भरतीमध्ये उमेदवारांना धावणे, उंचावरून उडी मारणे, मानवकृती खांद्यावर घेऊन दिलेल्या मार्गाने धावणे, चढणे आणि उतरणे अशी मैदानी परीक्षा होणार आहेत. तसेच उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी ही होणार आहे.

पुढे निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी झाल्यावर सहा महिने त्यांना अग्निशमन दलाचे प्रशिक्षण दिल्या नंतर सेवेत रुजू केले जाणार आहे.यावेळी १२० गुणांची मैदानी चाचणी, ८० गुणांची प्रमाणपत्र चाचणी होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com