
मुंबई : रेल्वे मंत्रालयाने देशभरातील १२७५ स्थानकांचा कायापालट करण्यासाठी 'अमृत भारत स्टेशन योजना' सुरु केली. या योजनेअंतर्गत देशभरातील १२७५ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. सध्या केंद्र सरकारकडून सुरु केलेल्या अमृत भारत स्टेशन योजनेद्वारे १०३ रेल्वे स्थानकांचा कायापालट पूर्ण झाला आहे. ज्यामध्ये चांगल्या प्रवासी सुविधा, सुधारित वाहतूक परिसंचरण, प्रगत साइन बोर्ड या गोष्टींचा समावेश आहे.