डोंबिवली - मानपाडा पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये बसून रील बनविणारा ठाकुर्लीतील वादग्रस्त रीलस्टार आणि बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र पाटील (वय-50) याच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.
एका 20 वर्षीय तरुणीला एअर होस्टेस म्हणून नोकरी लावून देतो सांगून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप सुरेंद्र पाटीलवर आहे. सुरेंद्र पाटील विरोधात याआधीही अनेक गुन्हे दाखल आहेत.
ठाकुर्ली येथील रीलस्टार सुरेंद्र पाटील आता पुन्हा एकदा चर्चेत आहे. त्याच्या विरोधात एका तरुणीवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. पीडित तरुणी ही पुण्याला राहते. सुरेंद्र पाटील याचे रील्स पाहून या तरुणीने सुरेंद्र पाटील याच्याशी मैत्री केली.
या तरुणीला सुरेंद्र पाटील याने एअर होस्टेसची नोकरी लावून देतो सांगत आपल्या जाळ्यात ओढले. तिच्यावर जबरदस्ती अत्याचार केला. हा प्रकार कुणाला सांगितल्यास तिच्या आई-वडिलांना ठार मारण्याची धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला. या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले असून, लवकरच सुरेंद्र याला अटक केली जाईल असे मानपाडा पोलिसांनी सांगितले.
डोंबिवली पूर्वेतील ठाकूर्ली परिसरात सुरेंद्र पाटील याचे वाईन शॉप आणि इतर दुकाने आहेत. सुरेंद्र पाटील हा एक रील स्टार म्हणून देखील प्रसिद्ध आहे. इन्स्टाग्रावर त्याचे अडीच लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. मानपाडा पोलीस ठाण्यात रील तयार केल्याप्रकरणी त्याला यापूर्वी अटक देखील झाली आहे.
दोन वर्षापूर्वी मानपाडा पोलिस ठाण्यात एका दाखल तक्रारी संदर्भातील कामानिमित्त सुरेंद्र पाटील गेला होता. त्यावेळी पोलीस स्टेशनमध्ये अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये कोणी नाही हे पाहत अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून त्याने रील बनवली होती. या प्रकरणात मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली होती.
पैशाच्या पाऊस पाडून देतो असं आमिष दाखवून भोंदू बाबांनी सुरेंद्र पाटीलला 40 लाखाचा गंडा घातला होता. या प्रकरणात जेव्हा आरोपींना अटक झाल्यानंतर त्याला पैसे परत दिले. त्यावेळी त्याने त्या पैशांसोबत रील तयार केली होती. त्या प्रकरणातही त्याच्या विरोधात तक्रार दाखल झाली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.