
देशातील सर्वांत मोठी दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने डिसेंबर तिमाहीत निव्वळ नफ्यात २६ टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे. दरवाढीमुळे सरासरी प्रति वापरकर्ता महसूल वाढल्याने जिओच्या नफ्यात वाढ झाली आहे.
मुंबई : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) लि.ने डिसेंबर तिमाहीतील निव्वळ नफ्यात ७.४ टक्क्यांनी वाढ होऊन १८,५४० कोटी रुपये झाल्याची नोंद केली आहे. ऊर्जा, रिटेल विक्री आणि डिजिटल सेवा (Digital Services) विभागातील चांगल्या कामगिरीमुळे कंपनीने वाढ नोंदवली आहे.