

Kundan Sankhe Denied Bail in Palghar Hospital Ruckus Case Neelam Sankhe Seeks Bail Relief on December 1
esakal
पालघर: रिलीफ रुग्णालयातील राडा प्रकरणात शिवसेनेचे निलंबित जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांचा जामीन अर्ज पालघर सत्र न्यायालयाने सोमवारी (ता. 23) फेटाळल्यानंतर आता याच प्रकरणातील न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेनेचे नगरसेवक नीलम संखे यांनी जामिनासाठी अतिरिक्त सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर येत्या १ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे कुंदन संखे यांचा जामीन फेटाळला गेल्यानंतर नीलम संखे यांना न्यायालयाकडून दिलासा मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.