गृहिणींना मोठा दिलासा, डिसेंबर महिन्यात पालेभाज्या, कांदे, बटाट्याचे दर 40 टक्क्यांनी घसरले

गृहिणींना मोठा दिलासा, डिसेंबर महिन्यात पालेभाज्या, कांदे, बटाट्याचे दर 40 टक्क्यांनी घसरले

मुंबई : मुंबईच्या घाऊक बाजारात गेल्या काही दिवसांपासून भाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. मात्र, आता हिरव्या पालेभाज्या, कांदे, बटाट्यांचे दर 40 टक्क्यांनी घसरले असून यामुळे गृहिणींना मोठा दिलासा आहे. 

परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीमुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबई एपीएमसी घाऊक बाजारात भाज्यांच्या किंमती वाढल्या होत्या, मात्र आता बाजारात भाज्यांचे दर कोसळले असून, कालपर्यंत 40 रुपये प्रतिकिलोने विकला जाणारा कोबी आणि फ्लॉवर आज 20 रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे. 

  • बटाटा 40 किलो 
  • कांदा 100 ला 3 किलो (क्वालिटीनुसार ) 30 रुपये ते 40 रुपये किलो
  • मेथी 10 किंवा 20 रुपये जुडी
  • पालक 10 रुपये जुडी
  • हिरवा वाटाणा 50 रुपये 
  • फ्लावर 20 रुपये किलो
  • टाॅमॅटो 40 रुपये किलो 
  • बटाटा - 40 रुपये किलो

भेंडी 20 रुपये, 30 रुपये जुडी विकला जाणाऱ्या कोथिंबीर 10 रुपये जुडी झाली आहे, मात्र किरकोळ बाजारावर कोणाचे नियंत्रण नसल्याने घाऊक बाजारात स्वस्त दरात मिळत असलेला भाजीपाला किरकोळ बाजारात दुप्पट दराने विकला जात आहे.

यंदा ऑक्टोबर महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पुणे, नाशिक जिल्ह्य़ातील भाजीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि उपनगरांमध्ये येणाऱ्या भाज्यांची आवक घटली होती. आवक घटल्याने ऐन नवरात्रीत भाज्यांच्या दरांमध्ये प्रचंड वाढ झाली होती. मात्र, नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच वातावरणात बदल झाला आहे. त्यामुळे नाशिक आणि पुणे जिल्ह्याात थंडीचे वातावरण जाणवू लागले आहे. हे वातावरण भाजी पिकांसाठी पोषक असल्यामुळे सध्या मुंबई, ठाणे आणि उपनगरामध्ये भाज्यांची आवक वाढू लागली आहे. त्यामुळे भाज्यांचे दर 40 टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, येत्या काही दिवसात आवक आणखी वाढणार असल्याने भाज्यांचे दर आणखी कमी होण्याची शक्यता विक्रेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

कांदा, बटाट्याची आवक ही वाढल्याने त्यांचे ही दर कमी झाले आहेत. येत्या महिनाभरात आणखी नवीन माल येण्याची शक्यता असून त्यानंतर त्यांचे दर अजून घसरण्याची शक्यता आहे, अशी माहिती कांदा-बटाटा विक्रेत्यांनी दिली. भाज्यांची आवक पुरेशा प्रमाणात होऊ लागल्यामुळे दरांमध्ये घसरण झाली आहे. येत्या काही दिवसात आवक वाढणार असून दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्येही भाजीपाल्याच्या दरात घसरण सुरूच आहे. 

APMC मार्केटमधील भाज्यांचे दर

  • फरसबी 20 ते 24 रुपये प्रतिकिलो
  • फ्लॉवर 5 ते 6 रुपये प्रतिकिलो
  • गवार 30 ते 36 रुपये प्रतिकिलो
  • गाजर 10 ते 12 रुपये प्रतिकिलो
  • भेंडी 20 ते 24 रुपये प्रतिकिलो
  • कोबी 5 ते 6 रुपये प्रतिकिलो
  • मिरची 25 ते 35 रुपये प्रतिकिलो
  • टोमॅटो 14 ते 16 रुपये प्रतिकिलो
  • काकडी 8 ते 10 रुपये प्रतिकिलो
  • वांगी 12 ते 15 रुपये प्रतिकिलो
  • कोथिंबीर 5 रुपये जुडी
  • हिरवा वाटाणा 25 ते 30 रुपये किलो

हिरवा वाटाणाही झाला स्वस्त - 

गेल्या महिन्यात हिरवा वाटाणा एकट्या दादर मार्केटमध्ये 200 किलोने विकला जात होता. शिवाय अनेक ठिकाणच्या बाजारात तो उपलब्ध ही नव्हता. विक्रेत्यांनाही तो परवडत नसल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता तो अनेक छोट्या बाजारात ही उपलब्ध असून बाजारात 50 रुपये किलोने विकला जात आहे. 

आवक वाढली - 

राज्यात इतर राज्यातून येणाऱ्या भाज्यांची आवक वाढली आहे. बेल्जियममधून वाटाणा, जोधपूरमधून गाजरची आवक वाढली आहे. थंडी पडल्यामुळे भाजीपाल्यासाठी पोषक वातावरण आहे. पिकही चांगल्या पद्धतीचे येत आहे. किमान 40 ते 50 टक्क्यांनी कमी झाले आहेत. पुढचे काही महिने हे भाव असेच कमी राहतील असे एपीएमसी घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघ अध्यक्ष कैलाश ताजणे यांनी सांगितले आहे. 

मुंबईत ही भाजीपाल्याचे दर झाले कमी - 

गोरेगावात मंगळवारी कोथिंबीर मोठी जुडी 15 रुपये आणि पालक जुडी 10 रु. फ्लॉवर मोठा गड्डा 20 रुपये किलोने विकला गेला.

( संपादन - सुमित बागुल )

relief to house makers vegetable prices dropped by almost forty percent in navi mumbai APMC

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com