राज्याला कोरोनातून मोठा दिलासा! "होम क्वारंटाईन' रुग्णांत घट; दिवाळीनंतर संख्या वाढण्याची भीती

राज्याला कोरोनातून मोठा दिलासा! "होम क्वारंटाईन' रुग्णांत घट; दिवाळीनंतर संख्या वाढण्याची भीती


मुंबई : राज्यात गेल्या आठ दिवसांत होम क्वारंटाईन असलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 58.6 टक्के घट झाली आहे. दरम्यान, दिवाळीनंतर या प्रकरणांमध्ये वाढ होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे. 

गेल्या दोन आठवड्यांपासून दररोज सुमारे 70 हजार चाचण्या केल्यानंतर राज्यात कोव्हिडमधील दररोजच्या नवीन रुग्णांमध्ये घट होऊन सरासरी 7000 झाली आहे. यासह सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. 1 नोव्हेंबरला तब्बल 25,44,799 लोक होम क्वारंटाईन होते; परंतु आता ही संख्या कमी होऊन 10,51,321 झाली आहे. रविवारी 8232 होम क्वारंटाईन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. पुणे आणि मुंबई ही दोन शहरे हॉटस्पॉट होती; मात्र आता सक्रिय रुग्णांची संख्या जवळपास 17000 वर आली आहे, असे राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले. 

राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, कोल्हापूर (323), धुळे (317), वाशिम (107), नंदुरबार (492) या जिल्ह्यांमध्ये कोव्हिड सक्रिय रुग्णांची संख्या सर्वांत कमी आहे. संस्थात्मक अलगीकरण केंद्रांमध्येही रुग्णांची संख्या कमी झाली असून, 1 नोव्हेंबरला नोंदवण्यात आलेल्या 12 हजार 230 वरून 8 नोव्हेंबरला 7912 पर्यंत घट झाली आहे. ही घट राज्यातील संस्थात्मक केंद्रांत 35 टक्के नोंदली गेली आहे. 

दिवाळीनंतर रुग्ण वाढू शकतात. लॉकडाऊनमध्ये विश्रांती असूनही संसर्ग दर नियंत्रणात ठेवण्यात सक्षम आहोत; परंतु पुढील 15 दिवस आमच्यासाठी निर्णायक असतील. कारण संसर्ग दर वाढू शकेल. त्यामुळे लोकांना अधिक सावधगिरी बाळगण्याची आणि सुरक्षिततेच्या उपायांचे पालन करण्याची गरज आहे. 
- डॉ. अर्चना पाटील,
राज्य आरोग्य संचालक 

होम क्वारंटाईन होणाऱ्या रुग्णांची चाचणी केली जात नाही. गाड्या आणि कार्यालये उघडण्याच्या घाईत आरोग्य विभाग बरे न झालेल्या रुग्णांना चुकवू शकतो. म्हणून त्यांनी अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. 
- डॉ. अभिजित मोरे,
सामाजिक कार्यकर्ते 

relief to maharashtra Corona Decrease in home quarantine patients fear of increase in numbers after Diwali

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com