Palghar News: 'हे पुस्तक वाचाल तर आजार, समस्या दूर होतील', १८ वर्षीय तरुणावर धर्मांतराचा प्रयत्न; २२ महिलांविरोधात गुन्हा दाखल
Religious Conversion Crime: मोखाड्यात धर्मांतराचा प्रयत्न होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी धार्मिक भावना दुखावल्याने २२ महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोखाडा : मोखाड्यातील वाकडपाडा येथे एका १८ वर्षीय तरुणाला धर्मांतरासाठी प्रवृत्त केले तसेच धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी २२ महिलांविरोधात मोखाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.